SBI Junior Associate Recruitment 2026 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ९,१२४ लिपिक पदांची महाभरती
SBI Junior Associate Bharti 2026: बँक क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट, मुंबई अंतर्गत ‘ज्युनियर असोसिएट’ (Customer Support & Sales) या लिपिक संवर्गातील (Clerical Cadre) ७,६८० नियमित पदे आणि १,४४४ बॅकलॉग पदे अशी मिळून एकूण ९,१२४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी तब्बल १,९९९ पदे (१,७१८ नियमित + २८१ बॅकलॉग) उपलब्ध आहेत. या भरतीची सविस्तर माहिती, पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.
१. पदांचा तपशील (Post Details)
| पद क्र. | पदाचे नाव (Post Name) | पद संख्या (Vacancies) |
|---|---|---|
| १ | Junior Associate (Customer Support & Sales) | ९,१२४ पदे (महाराष्ट्र: १,९९९ पदे) |
२. महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | ११ ऑगस्ट २०२६ |
| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ ऑगस्ट २०२६ |
| पूर्व परीक्षा (Prelims Exam) तारीख | सप्टेंबर २०२६ (अंदाजे) |
| मुख्य परीक्षा (Main Exam) तारीख | नोव्हेंबर २०२६ (अंदाजे) |
३. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर तपशील (Eligibility Details)
| पद नाव | शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) |
|---|---|
| Junior Associate |
१. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation Degree) उत्तीर्ण किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता. २. पदवीच्या अंतिम वर्षात/सेमिस्टरमध्ये असणारे उमेदवारही ऑनलाईन अर्ज करू शकतात, मात्र निवड झाल्यास 31.12.2026 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. ३. उमेदवाराला स्थानिक भाषा (महाराष्ट्रासाठी मराठी) वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे. (१० वी किंवा १२ वी मध्ये मराठी विषय असल्यास भाषा चाचणीची गरज नाही). |
वेतनमान (Pay Scale): स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार लिपिक संवर्गासाठी आकर्षक वेतन, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) व इतर भत्ते मिळून रु. ३५,०००/- ते रु. ४०,०००/- प्रतिमहिना (प्रारंभिक अंदाजे) वेतन मिळते.
वयोमर्यादा (Age Limit): ०१ एप्रिल २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे दरम्यान असावे. (उमेदवाराचा जन्म 02.04.1998 ते 01.04.2006 दरम्यान झालेला असावा).
वयोमर्यादेतील सवलत (Age Relaxation):
- OBC उमेदवार: ३ वर्षे सवलत (कमाल वय ३१ वर्षे)
- SC / ST उमेदवार: ५ वर्षे सवलत (कमाल वय ३३ वर्षे)
- PwBD (Gen/EWS): १० वर्षे सवलत
- PwBD (OBC): १३ वर्षे सवलत
- PwBD (SC/ST): १५ वर्षे सवलत
- माजी सैनिक (Ex-Servicemen): संरक्षण सेवेतील कालावधी + ३ वर्षे (कमाल ५० वर्षे)
- विधवा/घटस्फोटीत महिला: ७ वर्षे सवलत (General/EWS: ३५ वर्षे, OBC: ३८ वर्षे, SC/ST: ४० वर्षे)
- SBI चे प्रशिक्षित अप्रेंटिस: नियमानुसार १ ते ६ वर्षांपर्यंत सवलत.
नोकरीचे ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत (उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करेल त्या राज्यात नियुक्ती दिली जाईल. महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्यांना महाराष्ट्रात नोकरी मिळेल).
परीक्षा फी (Application Fee):
- General / OBC / EWS उमेदवार: रु. ७५०/- (Non-refundable)
- SC / ST / PwBD / XS / DXS उमेदवार: कोणतीही फी नाही (Nil)
- फी भरण्याची पद्धत: ऑनलाईन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे)
४. महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
| अधिकृत जाहिरात PDF (Official Notification) | Click Here |
| ऑनलाईन अर्ज करा (Online Application Form) | Click Here |
५. भरतीविषयक महत्त्वाची माहिती व निवड प्रक्रिया (Selection Process Details)
निवड प्रक्रिया (Selection Procedure): स्टेट बँक ऑफ इंडिया मधील ज्युनिअर असोसिएट (लिपिक) पदाची निवड प्रक्रिया प्रामुख्याने दोन टप्प्यांत आणि त्यानंतर स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाते:
१. पूर्व परीक्षा (Preliminary Examination): ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल (अंदाजे सप्टेंबर २०२६ मध्ये). १०० गुणांची वस्तुनिष्ठ (Objective) परीक्षा १ तासाच्या कालावधीची असते. यामध्ये इंग्रजी भाषा (English Language – ३० प्रश्न/३० गुण), अंकगणित (Numerical Ability – ३५ प्रश्न/३५ गुण) आणि बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning Ability – ३५ प्रश्न/३५ गुण) हे तीन विभाग असतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ (0.25) गुण वजा केले जातील.
२. मुख्य परीक्षा (Main Examination): पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन मुख्य परीक्षा (अंदाजे नोव्हेंबर २०२६ मध्ये) घेतली जाईल. ही परीक्षा २०० गुणांची असून यासाठी २ तास ४५ मिनिटांचा वेळ दिला जातो. यामध्ये जनरल/फायनान्शियल अवेअरनेस (५० प्रश्न/५० गुण), जनरल इंग्लिश (४० प्रश्न/४० गुण), कांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड (५० प्रश्न/५० गुण) आणि रीझनिंग व कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड (५० प्रश्न/६० गुण) असे १९० प्रश्न असतात.
३. स्थानिक भाषा चाचणी (Specified Opted Local Language Test): मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल. जे उमेदवार १० वी किंवा १२ वीच्या गुणपत्रकावर स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) शिकल्याचा पुरावा सादर करतील, त्यांना ही परीक्षा देण्याची गरज नाही. ही परीक्षा केवळ गुणवत्तेवर आधारित नसून पात्रता (Qualifying) स्वरूपाची असते.
महत्त्वाचे नियम व अटी:
- एकच राज्य पर्याय: उमेदवार फक्त एकाच राज्यासाठी/केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करू शकतात.
- आंतर-सर्कल बदली नाही: ज्युनिअर असोसिएट पदावर रुजू झाल्यानंतर पहिली ५ वर्षे कोणत्याही प्रकारची इंटर सर्कल किंवा इंटर स्टेट ट्रान्सफर (Inter Circle Transfer) दिली जात नाही.
- माजी कर्मचारी पात्र नाहीत: ज्या उमेदवारांनी आधी SBI मध्ये लिपिक संवर्गात काम केले आहे आणि राजीनामा दिला आहे किंवा जे सध्या SBI मध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहेत, ते अर्ज करण्यास पात्र नाहीत.
६. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions – FAQ)