🏠 होम पेज 📢 Latest जॉब्स 📥 ADMIT कार्ड 🏆 RESULT करंट अफेयर्स Q 💬 FeedBack
WhatsApp Join Telegram Join

महाराष्ट्र जॉब्स | सर्व जिल्हा अपडेट & ऑल सेंटर/प्राइवेट जॉब्स

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक, गट-क (मुख्य) परीक्षा – 2017 (भाग २)

परीक्षा दि. 31/12/2017 | प्रश्नपुस्तिका क्रमांक: X10

विषय: सामान्य ज्ञान, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र व बुद्धिमत्ता चाचणी

एकूण प्रश्न : 100 (प्र. 101 ते 200) | वेळ : 2 तास

101. राज्यपालाच्या निवडीसाठी खालीलपैकी पात्रतेचे निकष कोणते आहे/त ?
(a) तो भारताचा नागरिक असावा
(b) वयाची कमीत कमी 35 वर्षे पूर्ण असावीत
(c) संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधीमंडळाचे सदस्य नसावे

Which of the following is/are the eligibility criteria for selection of Governor ?
(a) Should be citizen of India
(b) Should be at least 35 years of age
(c) Should not be a member of either house of the Parliament or house of the state legislature

योग्य उत्तर निवडा / Select correct answer :

(1) (a) आणि (b) / (a) and (b)
(2) (b) आणि (c) / (b) and (c)
(3) फक्त (b) / Only (b)
(4) वरील सर्व / All the above

102. 1 जानेवारी 2017 पासून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोण आहेत ?
Who is the Secretary General of United Nations (UN) since 1st January 2017 ?
(1) बान-की-मून / Ban-Ki-Moon
(2) कोफी अन्नान / Kofi Annan
(3) अँटोनियो गुटेरेस / Antonio Guterres
(4) यु थांट / U Thant

103. उच्च न्यायालयाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणता/ते विधान/ने चुकीचे आहे/त ?
(a) उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
(b) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्ती वय 65 आहे.
(c) उच्च न्यायालयाच्या सर न्यायाधीशांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते.

Which of the following statement (s) is/are false about the High Court ?
(a) Every judge of a High Court is appointed by the Governor.
(b) Age of retirement of High Court judge is 65.
(c) Chief justice of High Court is appointed by the President of India.

पर्यायी उत्तरे / Answer options :

(1) फक्त (a) / only (a)
(2) फक्त (b) / only (b)
(3) (a), (b)
(4) वरील सर्व / All the above

104. संपूर्ण भारतात चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगान वाजविणे अनिवार्य आहे हा आदेश भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केव्हा दिला ?
When did the Supreme Court of India, made playing of National Anthem compulsory at the start of any cinema, in all the cinema halls of India ?
(1) ऑक्टोबर, 2015 / October, 2015
(2) जानेवारी, 2015 / January, 2015
(3) नोव्हेंबर, 2016 / November, 2016
(4) नोव्हेंबर, 2014 / November, 2014

105. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचून योग्य उत्तर निवडा.
(a) विधानपरिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते.
(b) विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे.
(c) विधानपरिषदेचे सर्व सदस्य निर्वाचित असतात.
(d) महाराष्ट्र विधान परिषदेत 288 सदस्य आहेत.

Read the following sentences carefully and choose correct answer.
(a) Strength of Legislative Council depends on that of the Legislative Assembly.
(b) Vidhan Parishad that is Legislative Council is permanent house.
(c) All members of Legislative Council are elected.
(d) Maharashtra Legislative Council has 288 members.

पर्यायी उत्तरे / Answer options :

(1) (a), (b)
(2) (b), (c)
(3) (c), (d)
(4) (b), (c), (d)

106. 1971 च्या लोकसंख्येला प्रमाण मानून इ.स. 2026 पर्यंत लोकसभेच्या सदस्य संख्येत कोणताही बदल होणार नाही, या तरतुदीनुसार केंद्रशासित प्रदेशांतील जनतेद्वारे 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये किती प्रतिनिधी निवडले गेले ?
Based on the population in year 1971 there would be no modification in the number of seats in Loksabha till 2026. According to this provision how many candidates were elected by the citizens of Union Territories in 2014 Loksabha elections ?
(1) 13
(2) 20
(3) 18
(4) 15

107. खालीलपैकी भारतीय संघराज्यासंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे ?
Which of the following characteristic is not correct in the context of Indian Federalism ?
(1) दुहेरी नागरिकत्व / Dual Citizenship
(2) दुहेरी शासनव्यवस्था / Dual Polity
(3) लिखित राज्यघटना / Written Constitution
(4) सत्ता विभाजन / Division of Powers

108. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘चीन हा आत्ता एक निद्रिस्त राक्षस आहे, पण तो ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी सर्व जग हादरवून सोडेल’ या आशयाचे विधान कोणी केले ?
‘China is a sleeping giant. Let her sleep, for when she wakes she will move the world’. Who made this sort of statement at the beginning of 19th century ?
(1) हिटलर / Hitler
(2) माओ-त्से-तुंग / Mao-tse-Tung
(3) नेपोलियन / Napoleon
(4) मुसोलीनी / Mussolini

109. राज्य शासनात मंत्रिमंडळ हे सामूहिकरीत्या कोणाला जबाबदार असते ?
(a) राज्यपाल          (b) मुख्यमंत्री          (c) विधानसभा

In the State Government the Council of Ministers is collectively responsible to the :
(a) Governor          (b) Chief Minister          (c) Vidhan Sabha

योग्य पर्याय निवडा / Select correct code :

(1) (a) आणि (b) / (a) and (b)
(2) फक्त (b) / only (b)
(3) फक्त (c) / only (c)
(4) वरील सर्व / All the above

110. राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या काय ठरविण्यात आली आहे ?
What is the maximum strength prescribed for State Legislative Assemblies ?
(1) 250
(2) 550
(3) 500
(4) 100

111. जानेवारी 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?
Who has been appointed as the Chairman of Union Public Service Commission (UPSC) in Jan. 2017 ?
(1) दिपक गुप्ता / Deepak Gupta
(2) डेव्हिड आर. सिम्लिह / David R. Syiemlieh
(3) अलका सिरोही / Alka Sirohi
(4) माता प्रसाद / Mata Prasad

112. खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल व भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली, त्या व्यक्तीचे नाव निवडा.
Who among the following is that one Indian Political Leader who held the post of a Chief Minister, Governor of an Indian State, Vice President as well as President of India ?
(1) रामास्वामी वेंकटरमन / Ramaswamy Venkatraman
(2) ग्यानी झैल सिंग / Gyani Zail Singh
(3) नीलम संजीव रेड्डी / Neelam Sanjiv Reddy
(4) डॉ. शंकर दयाल शर्मा / Dr. Shankar Dayal Sharma

113. शेतकऱ्यांसाठी स्वयंचलित हवामान स्थानकाचा वापर करणारे खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले ?
Which of the following states became First Indian State to use Automated Weather Stations for farmers ?
(1) महाराष्ट्र / Maharashtra
(2) बिहार / Bihar
(3) गुजरात / Gujarat
(4) राजस्थान / Rajasthan

114. रिचर्ड थेलर यांना 2017 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार त्यांच्या ________ योगदानासाठी देण्यात आला.
Richard Thaler was awarded the Nobel Prize in Economic Sciences-2017 for his contribution in ________.
(1) कल्याणकारी अर्थशास्त्रामधील / Welfare Economics
(2) आर्थिक समतोल सिद्धांतासंबंधीच्या / Economic Equilibrium Theory
(3) आर्थिक वृद्धी संदर्भातील / Economic Growth
(4) वर्तनवादी अर्थशास्त्रासंबंधीच्या / Behavioural Economics

115. भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही ?
Which is the place in India, where a ‘Jyotirling’ is not present ?
(1) ऑंकारेश्वर – मध्य प्रदेश / Onkareshwar – Madhya Pradesh
(2) विश्वेश्वर – उत्तर प्रदेश / Vishweshwar – Uttar Pradesh
(3) बृहदीश्वर – तमिळनाडू / Brihadishwar – Tamil Nadu
(4) परळी वैजनाथ – महाराष्ट्र / Parli-Vaijnath – Maharashtra

116. कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एका ठरावाद्वारे ‘माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य, हा मूलभूत मानवी अधिकार असल्याचे घोषित केले ?
In which year did the United Nations General Assembly declare ‘Freedom of Information’ as one of the fundamental human rights by a resolution ?
(1) 1948
(2) 1946
(3) 1956
(4) 1952

117. खालीलपैकी कोणत्या संघाने 2017, आय सी सी (ICC) महिला क्रिकेट जागतिक कप जिंकला ?
Which of the following team won the 2017, ICC Women’s Cricket World Cup ?
(1) इंग्लंड / England
(2) भारत / India
(3) दक्षिण आफ्रिका / South Africa
(4) ऑस्ट्रेलिया / Australia

118. 2017 च्या 53 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली ?
Which person is selected for the 53rd Jnanpith Award for the year 2017 ?
(1) रघुवीर चौधरी / Raghuveer Choudhari
(2) भालचंद्र नेमाडे / Bhalchandra Nemade
(3) केदारनाथ सिंग / Kedarnath Singh
(4) कृष्णा सोबती / Krishna Sobti

119. 2017 चे नोबेल शांती पुरस्कार कोणाला देण्यात आले ?
(a) जॉन मॅन्युअल संतोष
(b) कैलाश सत्यार्थी
(c) आण्विक शस्त्रास्त्र नष्ट करणारी आंतरराष्ट्रीय मोहीम (ICAN)

Nobel Peace Prize, 2017 awarded to whom ?
(a) Juan Manuel Santos
(b) Kailash Satyarthi
(c) International Campaign to Abolish Nuclear Weapons (ICAN)

योग्य उत्तर निवडा / Select correct answer :

(1) फक्त (b) / only (b)
(2) फक्त (c) / only (c)
(3) (a) आणि (c) / (a) and (c)
(4) यापैकी नाही / None of them

120. कोणत्या वर्षी कोणत्या घटनादुरुस्तीने भारतात मतदारांची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली ?
In which year and according to which constitutional amendment the minimum age to cast vote in elections was reduced to 18 years from 21 years ?
(1) 1976, 42 वी घटनादुरुस्तीने / 1976, 42nd amendment
(2) 1971, 26 वी घटनादुरुस्तीने / 1971, 26th amendment
(3) 1978, 44 वी घटनादुरुस्तीने / 1978, 44th amendment
(4) 1989, 61 वी घटनादुरुस्तीने / 1989, 61st amendment

121. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे ?
Which part of the Indian Constitution is associated with Citizenship ?
(1) भाग – I / Part – I
(2) भाग – II / Part – II
(3) भाग – III / Part – III
(4) भाग – IV / Part – IV

122. भारतीय संविधानकर्त्यांनी ‘केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीची’ कल्पना ________ च्या संविधानातून घेतली.
The framers of the Constitution of India, borrowed an idea of an ‘Appointment of State Governors by centre’, from the Constitution of ________.
(1) रशिया (यु.एस.एस.आर.) / Russia (USSR)
(2) दक्षिण आफ्रिका / South Africa
(3) ऑस्ट्रेलिया / Australia
(4) कॅनडा / Canada

123. “साहित्य अकादमी पुरस्कार” आसाराम लोमटेंच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ?
Which book by Asaram Lomate received the “Sahitya Academy Award” ?
(1) इडा पीडा टळो / Idha Pidha Talo
(2) धूळ पेर / Dhul Per
(3) आलोक / Aalok
(4) 14 महिने 13 दिवस आणि . . . / 14 Mahine 13 Diwas Aani . . .

124. माहितीच्या अधिकारासंबंधीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
Which is the first state in India to allow on-line filing of Right to information (RTI) applications ?
(1) गुजरात / Gujarat
(2) पश्चिम बंगाल / West Bengal
(3) आंध्र प्रदेश / Andhra Pradesh
(4) महाराष्ट्र / Maharashtra

125. यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरले ?
Which of the following countries is the first in the world to grant citizenship to a Robot ?
(1) अमेरिका / America
(2) जपान / Japan
(3) सौदी अरेबिया / Saudi Arabia
(4) अफगाणिस्तान / Afganisthan

126. सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची पहिली भारतीय मोहीम ________.
First Indian mission to study the Sun ________.
(1) भास्करायन / Bhaskarayan
(2) चंद्रायन / Chandrayan
(3) आदित्य – एल 1 / Aditya – L1
(4) गगन / Gagan

127. राज्यातील मुलींना बालवाडी ते पी एच् डी पर्यंतचे शिक्षण निःशुल्क देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली ?
Which State Government declared free education for every girl student from Kindergarten to Ph.D. ?
(1) उत्तर प्रदेश सरकार / Uttar Pradesh Government
(2) राजस्थान सरकार / Rajasthan Government
(3) गुजरात सरकार / Gujarat Government
(4) पंजाब सरकार / Punjab Government

128. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयास आपल्या निर्णयांवर व आदेशांवर पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे ?
According to which article in constitution, the Supreme Court has the right to re-consider its decisions or orders ?
(1) कलम 138 नुसार / Article 138
(2) कलम 142 नुसार / Article 142
(3) कलम 137 नुसार / Article 137
(4) कलम 143 नुसार / Article 143

129. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला “भारतीय राज्यघटनेचा आत्मा” कोणी म्हटले आहे ?
Who referred the preamble to the Indian Constitution as the “Soul of Indian Constitution” ?
(1) के.एम. मुन्शी / K.M. Munshi
(2) डॉ. बी.आर. आंबेडकर / Dr. B.R. Ambedkar
(3) ठाकूर दास भार्गव / Thakur Das Bhargav
(4) एम.व्ही. पायली / M.V. Pylee

130. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन व बॅलेट वर ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (NOTA) या बटनाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली ?
In which year was ‘None of the above’ (NOTA) button introduced in EVMs (Electronic Voting Machines) and ballots ?
(1) 2015
(2) 2013
(3) 2011
(4) 2009

131. ‘महाराष्ट्र मिशन 1 मिलियन’ हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
The ‘Maharashtra Mission 1 Million’ programme is related to which sport ?
(1) हॉकी / Hockey
(2) क्रिकेट / Cricket
(3) फुटबॉल / Football
(4) व्हॉलीबॉल / Volleyball

132. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्राच्या राज्य सरकारने कोणते पोर्टल सुरू केले ?
Which of portal is launched by the State Government of Maharashtra to provide information about all the Maharashtra Government schemes ?
(1) महालाभार्थी (Mahalabharthi)
(2) महालक्ष्मी (Mahalaxmi)
(3) महास्कीम्स (Mahaschemes)
(4) महायोजना (Mahayojana)

133. पदासाठी आवश्यक असणारी पात्रता अंगी नसताना एखादे सरकारी/सार्वजनिक पद बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीने बळकावले असेल तर त्यासाठी न्यायालयात कोणता अर्ज केला जातो ?
If any ineligible candidate unlawfully acquires any public/Government post, then which of the following can be charged against him/her in the court ?
(1) प्रतिषेध / Prohibition
(2) उत्प्रेषण / Certiorari
(3) अधिकार पृच्छा / Quo Warranto
(4) परमादेश / Mandamus

134. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी बालकांची विक्री व लैंगिक शोषण या विरुद्ध लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला ?
Which programme was launched by Nobel Prize Winner Kailash Satyarthi to fight against child trafficking and their sexual abuse ?
(1) बेटी बचाओ – बेटी पढाओ / Beti Bachao – Beti Padhao
(2) सुरक्षित माता – सुरक्षित बालक / Surakshit Mata – Surakshit Balak
(3) सुरक्षित बचपन – सुरक्षित भारत / Surakshit Bachpan – Surakshit Bharat
(4) सक्षम भारत – सुरक्षित बालक / Saksham Bharat – Surakshit Balak

135. ‘2017 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ देवेंद्र झाझरीया यांना ________ मधील त्यांच्या विशेष कामगिरीसाठी देण्यात आला.
Devendra Jhajhria was awarded ‘Rajiv Gandhi Khelratna Award-2017’ for his outstanding performance in ________.
(1) हॉकी / Hockey
(2) भालाफेक / Javelin throw
(3) मुष्टीयुद्ध / Boxing
(4) कुस्ती / Wrestling

136. पुढील संख्यामालिकेत न बसणारी फक्त एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा.
16, 19, 21, 30, 46, 71, 107

In the following number series, only one number is wrong. Which do not fit in the series, find out that wrong number.
16, 19, 21, 30, 46, 71, 107

(1) 30
(2) 19
(3) 71
(4) 46

137. खाली एक प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासंबंधीची माहिती पुरविणारी दोन विधाने दिलेली आहेत.

X हा N शी कसा संबंधित आहे ?
(a) X ही J ची आई आहे. T चे Z शी लग्न झाले आहे. N ही T ची मुलगी आहे. Z हा J चा भाऊ आहे.
(b) X चे Y शी लग्न झाले आहे. Y हा J चा वडील आहे. J चे L शी लग्न झाले आहे. J हा N चा चुलता आहे.

विधानांबाबतचा योग्य पर्याय निवडा.

One question and two statements providing information to answer the question are given below.

How is X related to N ?
(a) X is the mother of J. T is married with Z. N is the daughter of T. Z is the brother of J.
(b) X is married with Y, Y is the father of J. J is married with L. J is the uncle of N.

Select correct alternative about the statements.

(1) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विधान (a) व विधान (b) मधील एकत्रित माहिती पुरेशी नाही.
     The data even in both statements (a) and (b) together are not sufficient to answer the question.
(2) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त विधान (a) मधील माहिती पुरेशी आहे तर विधान (b) मधील माहिती पुरेशी नाही.
     The data in statement (a) alone is sufficient to answer the question while the data in statement (b) alone is not sufficient to answer the question.
(3) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त विधान (a) किंवा फक्त विधान (b) मधील माहिती पुरेशी आहे.
     The data either in statement (a) alone or statement (b) alone are sufficient to answer the question.
(4) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विधान (a) व विधान (b) मधील एकत्रित माहिती आवश्यक आहे.
     The data in both statements (a) and (b) together are necessary to answer the question.

138. स्थिती न बदलता जाळीच्या चौकटीत बसवण्यास योग्य पर्याय निवडा.
Select the option that can be used for completing the grill without changing its position.

(1)

(2)

(3)

(4)

(1) पर्याय (1)
(2) पर्याय (2)
(3) पर्याय (3)
(4) पर्याय (4)

139. जर A = 1, B = 2, C = 3…… असे क्रमाने असेल तर आकृतीमधील लुप्त झालेला भाग शोधा.
If A = 1, B = 2, C = 3…… respectively, then find the missing part of the diagram.
K J D W Q
R L F E X
Y S M G A
B U T ? ?
I C V ? ?
N H
P O
(1)

H N
P O
(2)

P N
H O
(3)

O H
P N
(4)

(1) पर्याय (1)
(2) पर्याय (2)
(3) पर्याय (3)
(4) पर्याय (4)

140. खालील प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट सूत्रानुसार आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.
The numbers in each of the following figure are according to some rule. Find the missing number in place of question mark ?
12 63 7 35 9
16 32 11 88 4
17 96 13 117 12
? 42 13 65 7
(1) 21
(2) 19
(3) 11
(4) 13

141. एका सांकेतिक भाषेत ANTICIPATION हा शब्द ICITNANOITAP असा लिहितात तर त्याच भाषेत PRODUCTIVITY हा शब्द कसा लिहाल ?
In a certain code language ANTICIPATION is written as ICITNANOITAP. How will be PRODUCTIVITY written in that code ?
(1) CUDOPRYTIVIT
(2) CUDORPYTIUIT
(3) CUDORPYTIVIT
(4) CUDORPTYIUIT

142. खालील प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट सूत्रानुसार आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
The numbers in each of the following figures are according to some formula. Which number will occur in the place of question mark ?
7 9 189 6
8 3 60 5
9 4 ? 8
(1) 144
(2) 288
(3) 96
(4) 244

143. पुढील दिलेल्या माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या :
जर A × B म्हणजे A हा B चा मुलगा आहे.
जर A + B म्हणजे A ही B ची मुलगी आहे.
जर A ÷ B म्हणजे A ही B ची पत्नी आहे.
जर A – B म्हणजे A हा B चा वडील आहे.

H ही E ची आई आहे हे प्रस्थापित होण्यासाठी खालील विधानात प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ?
E + F – G ? H

Read the following information carefully and answer the question :
If A × B means A is son of B.
If A + B means A is daughter of B.
If A ÷ B means A is wife of B.
If A – B means A is father of B.

What will come in the place of question mark in the following statement to establish that H is mother of E ?
E + F – G ? H

(1) ÷
(2) ×
(3) –
(4) (1), (2), (3) पैकी नाही / None of (1), (2), (3)

144. प्रश्न आकृतीत, आकृत्यांची एक श्रृंखला दिलेली आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य ती आकृती उत्तर आकृत्यातून निवडा.
A series of figures is given in the question figure. Select a correct figure from answer figures which will replace the question mark.

प्रश्न आकृत्या / Question Figures :

?

उत्तर आकृत्या / Answer Figures :

(a)(b)(c)(d)

(1) (a)
(2) (b)
(3) (c)
(4) (d)

145. खालील प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट सूत्रानुसार आहेत. खालीलपैकी कोणती संख्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येईल ?
The numbers in each of the following figure are according to some formula. Which one of the following number will occupy the question mark ?
23 137

(i)

45 3121

(ii)

67 57?

(iii)

(1) 40
(2) 41
(3) 42
(4) 43

146. एका कारच्या प्रत्येक चाकाचा व्यास 70 सेमी. आहे. जर कारचा वेग ताशी 66 किमी. असेल तर प्रत्येक चाक 10 मिनिटात किती वेळा पूर्ण फिरेल ? (π = 22/7 घ्या)
Each wheel of a car is of diameter 70 cm. How many complete revolutions does each wheel make in 10 minutes when the car is travelling 66 km/hr ? (Take π = 22/7)
(1) 11,000
(2) 7,000
(3) 5,500
(4) 5,000

147. एका वर्षाचे ₹ 8,000 मुदलाचे 6½% द.सा.द.शे. दराने व्याज काढा.
Calculate yearly interest on ₹ 8,000 at the rate of interest 6½% per annum.
(1) ₹ 520
(2) ₹ 480
(3) ₹ 500
(4) ₹ 560

148. छापील किंमतीवर शेकडा 6 सूट देऊन दुकानदाराने एक पंखा ₹ 1,128 ला विकला, तर पंख्याची छापील किंमत किती ?
A shopkeeper sold a fan for ₹ 1,128 after giving 6% discount. Find the Market price.
(1) ₹ 1,134
(2) ₹ 2,000
(3) ₹ 1,200
(4) ₹ 1,250

149. एका पुस्तकाची छापील किंमत ₹ 180 असून ते ₹ 153 ला विकले. तर शेकडा सूट काढा.
A book is marked ₹ 180 and sold for ₹ 153. Find the rate of discount.
(1) 15 %
(2) 27 %
(3) 20 %
(4) 17.65 %

150. स्वतःच्या विहिरीसाठी लिफ्ट पंप घेण्याकरिता राम ने 3 वर्षासाठी ₹ 12.5 द.सा.द.शे. दराने चक्रवाढ व्याजावर ₹ 16,000 उधार घेतले. जर त्यांनी सरळ व्याजावर पैसे उधार घेतले असते तर व्याजातला फरक किती असता ?
In order to buy a lift pump for his well Ram borrowed ₹ 16,000 for 3 years at a rate of compound interest of ₹ 12.5 p.c.p.a. What would have been the difference in the interest on his principal had he borrowed it at simple interest ?
(1) ₹ 780
(2) ₹ 781.25
(3) ₹ 782.50
(4) ₹ 794.75

151. तीन क्रमागत विषम नैसर्गिक संख्या अशा आहेत की पहिल्या व दुसऱ्या संख्यांचा गुणाकार तिसऱ्या संख्येच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे. तर त्यातली दुसरी संख्या कोणती ?
Three consecutive odd natural numbers are such that the product of the first and second number is 1 more than two times the third number. Which is the second number ?
(1) 3
(2) 5
(3) 7
(4) 9

152. 30 कर्मचाऱ्यांनी एक वर्षात उपभोगलेल्या वैद्यकीय रजेची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
Information regarding the medical leave enjoyed by 30 employees in one year is given in the following table.
दिवसांची संख्या / No. of days 0 – 10 10 – 20 20 – 30 30 – 40 40 – 50
कर्मचाऱ्यांची संख्या / No. of employees 5 7 11 4 3
तर कर्मचाऱ्यांनी एका वर्षात उपभोगलेल्या वैद्यकीय रजेचा मध्य काढा.
Find the mean number of medical leaves in one year.
(1) 23.45 दिवस / 23.45 days
(2) 25 दिवस / 25 days
(3) 22.67 दिवस / 22.67 days
(4) 27.24 दिवस / 27.24 days

153. द.सा.द.शे. 10 दराने ₹ 50,000 मुदलाचे सरळव्याजाने किती वर्षात ₹ 60,000 होतील ?
In how many years a sum of ₹ 50,000 will amount to ₹ 60,000 at 10% per annum simple interest ?
(1) 2 वर्षे / 2 years
(2) 4 वर्षे / 4 years
(3) 2.5 वर्षे / 2.5 years
(4) 3 वर्षे / 3 years

154. जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 कि.ग्रॅ. भरते आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 कि.ग्रॅ. भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा.
If 3/5th part of a pail is filled with water then it weighs 15 kg and if 4/5th part of the pail is filled with water then it weighs 19 kg. Then what is the weight of the pail when it is fully filled ?
(1) 20 कि.ग्रॅ. / 20 kg
(2) 21 कि.ग्रॅ. / 21 kg
(3) 22 कि.ग्रॅ. / 22 kg
(4) 23 कि.ग्रॅ. / 23 kg

155. 4 मुले व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर समितीमध्ये कमीतकमी एक मुलगी असण्याची संभाव्यता किती ?
A committee of two people is to be formed from 4 boys and 2 girls. What is the probability of having at least one girl in the committee ?
(1) 1/2
(2) 3/5
(3) 2/5
(4) 7/15

156. एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.
The average age of group of 100 students is 60 and for another group of 50 students, the average age is 90. Find the average age of combined group of 150 students.
(1) 65
(2) 75
(3) 80
(4) 70

157. एक मधमाशी सकाळी तिचे पोळे सोडते आणि उत्तर दिशेला 30 मिनिटे उडल्यानंतर एका बागेत पोहोचते व तिथे 10 मिनिटे मध गोळा करते. त्यानंतर ती पूर्व दिशेला 40 मिनिटे उडते आणि दुसऱ्या बागेत 15 मिनिटे मध गोळा करते. त्यानंतर ती सर्वात जवळच्या मार्गाने तिच्या पोळ्यापाशी परत येते. समजा मधमाशीचा उडण्याचा वेग तिच्या प्रवासात एकसमान होता, तर मधमाशी किती काळ आपल्या पोळ्यापासून दूर होती ?
A bee leaves its hive in the morning and after flying for 30 minutes due north reaches a garden and spends 10 minutes there collecting honey. Then it flies for 40 minutes due east and collects honey in another garden for 15 minutes. Then it returns to the hive taking the shortest route. Assuming that the speed of the bee was constant throughout its flight, how long the bee was away from its hive ?
(1) 145 मि. / 145 min.
(2) 135 मि. / 135 min.
(3) 125 मि. / 125 min.
(4) 115 मि. / 115 min.

158. एका गाडीने 555 कि.मी. प्रवासाचा काही भाग ताशी 60 कि.मी. वेगाने पार केला. नंतर गाडीचा वेग ताशी 15 कि.मी. वाढवून उरलेला प्रवास पूर्ण केला. जर एकूण 8 तासात त्याने सर्व प्रवास पूर्ण केला असेल तर ताशी 60 कि.मी. या वेगाने त्या गाडीने किती कि.मी. प्रवास केला व त्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागला ?
A car travels some part of a 555 km journey at a speed of 60 km/hr. It increases its speed by 15 km/hr for the remaining distance. If it covers the entire distance in 8 hrs, then how much distance does it cover at 60 km/hr and how much time does it take to cover this distance ?
(1) 120 कि.मी. 2 ताशी / 120 km, 2 hrs
(2) 180 कि.मी. 3 ताशी / 180 km, 3 hrs
(3) 240 कि.मी. 4 ताशी / 240 km, 4 hrs
(4) 360 कि.मी. 6 ताशी / 360 km, 6 hrs

159. तीन माणसे व चार मुले एक काम 14 दिवसात पूर्ण करू शकतात, तर तेच काम चार माणसे व सहा मुले 10 दिवसात पूर्ण करतात. तर दोन माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?
Three men and four boys can do a piece of work in 14 days while four men and six boys do the same work in 10 days. How long would it take two men to finish the same work ?
(1) 30 दिवस / 30 days
(2) 35 दिवस / 35 days
(3) 55 दिवस / 55 days
(4) 70 दिवस / 70 days

160. एका आठवड्यात चार विक्रेत्यांकडून झालेली विक्री खाली दिलेल्या वृत्तलेखात दिली आहे. त्याचा अभ्यास करून जर विक्रेता A ची एकूण विक्री ₹ 18,000 असेल तर सर्वात जास्त व सर्वात कमी विक्रींमधील फरक काढा.
The following Pie diagram shows the weekly sales of four sellers. If seller A has a total sale of ₹ 18,000 then find the difference in sales between the highest and lowest seller.

विक्रेता A / Seller A 90°

विक्रेता B / Seller B 120°

विक्रेता C / Seller C 80°

विक्रेता D / Seller D 70°

(1) ₹ 2,500
(2) ₹ 5,000
(3) ₹ 7,500
(4) ₹ 10,000

161. पासबुक मध्ये रक्कम ₹ 5,000 दोनदा नावे करण्यात आली आहे. जर रोखडवहीनुसार आरंभीचा बिंदू अधिकर्ष आहे तर ________.
An amount of ₹ 5,000 is debited twice in the Pass Book. When overdraft as per the Cash Book is the starting point then ________.
(1) ₹ 5,000 वजा केले जातील / ₹ 5,000 will be deducted
(2) ₹ 5,000 अधिक केले जातील / ₹ 5,000 will be added
(3) ₹ 10,000 वजा केले जातील / ₹ 10,000 will be deducted
(4) ₹ 10,000 अधिक केले जातील / ₹ 10,000 will be added

162. खालीलपैकी खतावणीचे उप-विभाग आहे :
The following is the subdivisions of ledger :
(1) विक्रीचे खतावणी / Sales ledger
(2) धनकोचे खतावणी / Creditor’s ledger
(3) सर्वसाधारण खतावणी / General ledger
(4) वरीलपैकी सर्व / All of the above

163. शालेय कार्यक्रमाच्या मुख्य अतिथीस दिलेली रक्कम ________ म्हणून मानली जाते.
(a) भेट          (b) दान          (c) सेवा शुल्क          (d) मानधन
वरीलपैकी कोणते उत्तर/उत्तरे बरोबर आहेत ?

Payment made to the Chief Guest of school program, is termed as :
(a) Gift          (b) Donation          (c) Service Charge          (d) Honorarium
Which of the above answer/answers are right ?

(1) (a) आणि (c) / (a) and (c)
(2) (b) फक्त / (b) only
(3) (d) फक्त / (d) only
(4) (c) फक्त / (c) only

164. ________ हे रोख आणि धनादेश हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याने केलेली अफरातफर उघडकीस आणू शकते.
________ can reveals frauds committed by the staff handling cash and cheques.
(1) ताळेबंद / Balance sheet
(2) रोजकीर्द / Journal
(3) तेरीजपत्रक / Trial balance
(4) बँक मेळजुळणी पत्रक / Bank Reconciliation statement

165. अधिकोष मेळजुळणी यांच्याकडून तयार करतात :
A Bank Reconciliation is prepared by :
(1) अधिकोष / a Bank
(2) संस्था / the firm
(3) धनको / creditors
(4) ऋणको / debtors

166. उधारीवरची व्यवसायाची मालमत्ता विक्रीची नोंद यामध्ये आहे :
The sale of a business asset on credit is recorded in :
(1) विक्री रोजकीर्द / Sales Day Book
(2) सर्वसाधारण रोजकीर्द / General Journal
(3) खरेदी पुस्तक / Purchase Book
(4) रोख पुस्तक / Cash Book

167. खालील विधाने विचारात घ्या :
(a) विक्री – ढोबळ नफा = विक्री मालाचा परिव्यय.
(b) वसूल न होण्याची शक्यता असणाऱ्या कर्जाची तरतूद बुडीत ऋणको खात्याच्या नावे बाजूस केली जाते.
(c) मालकाच्या वतीने आयकर भरलेली रक्कम नफा आणि तोटा खात्यास नावे बाजूस लिहितात.
(d) नफा नेहमी रोख किंवा अधिकोष शिल्लक दर्शवितो.

Consider the following statements :
(a) Sales – Gross Profit = Cost of goods sold.
(b) The provision for doubtful debts is debited to Bad Debts Account.
(c) Income Tax paid on behalf of the proprietor is debited to the Profit and Loss Account.
(d) Profit is always represented as cash or bank balance.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? / Which of the statement given above is/are correct ?

(1) (a) आणि (b) / (a) and (b)
(2) (a) आणि (c) / (a) and (c)
(3) (a) फक्त / (a) only
(4) (d) फक्त / (d) only

168. अधिकोष मेळजुळणी पत्रक हे आहे :
A Bank Reconciliation statement is a :
(1) रोख पुस्तकाचा भाग / Part of Cash Book
(2) अधिकोष खात्याचा भाग / Part of Bank Account
(3) ऋणको खात्याचा भाग / Part of Debtor’s Account
(4) वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

169. खालील जोड्या लावा :
(a) आय आणि व्यय खाते          (i) महसुली आय
(b) भांडवल निधी                    (ii) रोखड व्यवहार नोंदीचा सारांश
(c) भांडवली खर्च                    (iii) देयतेपेक्षा मालमत्ता अधिक
(d) शाळेस वेतन अनुदान           (iv) स्थिर मालमत्ता विकत घेणे

Match the following :
(a) Receipt and Payment Account      (i) Revenue Income
(b) Capital Fund                                (ii) Summary Record of cash transactions
(c) Capital Expenditure                      (iii) Excess of Assets over liabilities
(d) Salary grant to school                   (iv) Acquiring Fixed Assets

पर्यायी उत्तरे / Answer options :
      ( a ) ( b ) ( c ) ( d )

(1) (i) (ii) (iii) (iv)
(2) (iii) (ii) (i) (iv)
(3) (ii) (iii) (iv) (i)
(4) (iv) (iii) (i) (ii)

170. एकल व्यापारी संस्थेबाबत, नफा व तोटा पत्रकात दर्शविलेली निव्वळ तोट्याची रक्कम भांडवल खात्याला वर्ग करतात याचा परिणाम ________.
(a) भांडवल खाते जमा होते
(b) भांडवल खाते नावे होते
(c) नफा आणि तोटा पत्रक नावे होते
(d) नफा आणि तोटा पत्रक जमा होते

In case of sole-proprietary firm, the amount of net loss shown by the Profit and Loss Account is transferred to capital account, the result ________.
(a) Capital Account is credited
(b) Capital Account is debited
(c) Profit and Loss Account is debited
(d) Profit and Loss Account is credited

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? / Which of the above statement(s) is/are correct ?

(1) (a) फक्त / (a) only
(2) (b) आणि (c) / (b) and (c)
(3) (b) आणि (d) / (b) and (d)
(4) (a) आणि (d) / (a) and (d)

171. समायोजित नोंदी बनवलेल्या असतात :
Adjusting entries are made at the :
(1) लेखांकन कालावधीच्या शेवटी / end of the accounting period
(2) लेखांकन कालावधीच्या सुरुवातीला / beginning of the accounting period
(3) लेखांकन कालावधीच्या मध्यावधी / middle of the accounting period
(4) वरीलपैकी कोणतेही नाही / none of the above

172. मालकाने व्यवसायात आणलेली रक्कम या जमा बाजूस असली पाहिजे.
The amount brought in by the proprietor in the business should be credited to :
(1) रोख खाते / Cash Account
(2) भांडवल खाते / Capital Account
(3) उचल खाते / Drawings Account
(4) खरेदी खाते / Purchase Account

173. शैक्षणिक संस्थेला इमारत बांधण्याच्या विशेष हेतूने मिळालेली देणगी ________.
(a) उत्पन्न आणि खर्च खात्यास घेतात
(b) ताळेबंदाच्या मालमत्ता बाजूस घेतात
(c) ताळेबंदाच्या देयतेच्या बाजूस घेतात

Educational Institution received donation for special purpose of Building Construction it ________.
(a) should be taken to Income and Expenditure Account
(b) should be taken to Assets side of Balance Sheet
(c) should be taken liabilities side of Balance Sheet

यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ? / Which is correct option ?

(1) (a) फक्त / (a) only
(2) (b) फक्त / (b) only
(3) (c) फक्त / (c) only
(4) यापैकी कोणताही नाही / None of the above

174. खतावणी नोंदीचे व्यवहार यामध्ये आहेत :
Ledger records transactions in :
(1) कालक्रमानुसार क्रम / a chronological order
(2) विश्लेषणात्मक क्रम / an analytical order
(3) आठवड्यानुसार / by weekly
(4) वरीलपैकी सर्व / all of the above

175. खालीलपैकी कशाची नोंद उत्पन्न आणि खर्च खात्यास केली जाते ?
(a) स्थिर मालमत्तेच्या विक्रीवरील तोटा
(b) इमारतीची खरेदी
(c) यंत्रसामग्रीची विक्री
(d) स्थिर मालमत्तेवर उद्भवलेला भांडवली खर्च

Which of the following is/are to be recorded in an Income and Expenditure Account ?
(a) Loss on sale of Fixed Assets
(b) Purchase of Building
(c) Sale of Machinery
(d) Capital Expenditure incurred on Fixed Assets

पर्यायी उत्तरे / Answer options :

(1) (a) फक्त / (a) only
(2) (b) फक्त / (b) only
(3) (b) आणि (c) फक्त / (b) and (c) only
(4) (d) फक्त / (d) only

176. खरेदी पुस्तकामध्ये केवळ ________ खरेदीची नोंद केली जाते.
Only ________ purchases are recorded in Purchase Book.
(1) रोख / Cash
(2) उधार / Credit
(3) लहान आकाराच्या / Small Scale
(4) वरीलपैकी नाही / None of the above

177. रहस्य/अनिश्चित खाते केव्हा उघडतात :
A Suspense Account is opened when :
(1) ताळेबंद सहमत होत नाही / The Balance Sheet does not agree
(2) तेरीजपत्रक सहमत होत नाही / The Trial Balance does not agree
(3) नफा व तोटा लेखा सहमत होत नाही / The Profit and Loss Account does not agree
(4) व्यापारी लेखा सहमत होत नाही / The Trading Account does not agree

178. जोड्या लावा :
(a) आजीवन सभासद शुल्क पावती          (i) महसुली आय
(b) भाड्यापोटी दिलेली रक्कम                (ii) भांडवली आय
(c) इमारत संपादन करण्यासाठी दिलेली रक्कम    (iii) महसुली खर्च
(d) धर्मदाय संस्थेकडून मिळालेली देणगी      (iv) भांडवली व्यय

Match the following :
(a) Life membership fees receipts          (i) Revenue Receipts
(b) Payment of Rent                              (ii) Capital Receipts
(c) Payment for acquiring building           (iii) Revenue expenses
(d) Donation Received by Charitable Institution    (iv) Capital Payment

पर्यायी उत्तरे / Answer options :
      ( a ) ( b ) ( c ) ( d )

(1) (iii) (ii) (i) (iv)
(2) (iv) (i) (iii) (ii)
(3) (ii) (iii) (iv) (i)
(4) (iii) (i) (ii) (iv)

179. ₹ 5,125 ची लेखा पुस्तकामध्ये ₹ 5,120 अशी करण्यात आलेली नोंद ही ________ होय.
₹ 5,125 recorded as ₹ 5,120 in the books of account. It is ________.
(1) नजरचुकीने/विसरलेल्या चुका / Error of Omission
(2) जाणीवपूर्वक केलेल्या चुका / Error of Commission
(3) तात्त्विक चुका / Error of Principle
(4) भरपाई चुका / Compensating Error

180. जर ढोबळ नफ्याचा दर हा विक्रीवर 25% आहे. वस्तूचा विक्री खर्च ₹ 1,05,300 आहे तर ढोबळ नफ्याची रक्कम ________ असेल.
If the rate of Gross Profit is 25% on sales and the cost of goods sold is ₹ 1,05,300, the amount of Gross Profit will be ________.
(1) ₹ 26,325
(2) ₹ 35,100
(3) ₹ 21,060
(4) ₹ 10,530

181. भारतातील नवीन आर्थिक सुधारणा काँग्रेस (आय) सरकारने कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू केली ?
New Economic Reform in India were introduced by the Congress (I) Government led by :
(1) राजीव गांधी / Rajiv Gandhi
(2) मनमोहन सिंग / Manmohan Singh
(3) पी.व्ही. नरसिंहराव / P.V. Narasimha Rao
(4) यापैकी कोणीही नाही / None of these

182. पुढीलपैकी योग्य विधान निवडा.
(a) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी, 1995 रोजी करण्यात आली.
(b) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे.

Select the correct statement from the following.
(a) World Trade Organisation established on 1st January, 1995.
(b) The headquarter of World Trade Organisation is at Geneva, Switzerland.

पर्यायी उत्तरे / Answer options :

(1) फक्त (a) / Only (a)
(2) फक्त (b) / Only (b)
(3) (a) आणि (b) दोन्ही / (a) and (b) both
(4) यापैकी एकही नाही / None of the above

183. खालील विधाने विचारात घ्या :
(a) कर्ज परतफेड हमी निधीची स्थापना 2001 – 02 मध्ये झाली.
(b) निर्गुंतवणूक विभागाची स्थापना 2002 – 03 मध्ये झाली.
(c) खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये झाली.

Consider the following statements :
(a) Loan Guarantee Redemption Fund was established in 2001 – 02.
(b) Department of Dis-investment was set up from 2002 – 03.
(c) Expenditure Reforms Commission was constituted in Feb. 2000.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? / Which of the statement/s given above is/are correct ?

(1) (a) व (b) / (a) and (b)
(2) (b) व (c) / (b) and (c)
(3) (a) व (c) / (a) and (c)
(4) वरीलपैकी सर्व / All of the above

184. प्रत्यक्ष कर संहितेने (DTC) पुढीलपैकी कोणत्या कायद्याची जागा घेतली आहे ?
(a) आयकर कायदा, 1961
(b) केंद्रीय विक्रीकर कायदा, 1956
(c) केंद्रीय उत्पादनशुल्क कायदा, 1944
(d) केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017

Which of the following Act is replaced with Direct Tax Code (DTC) ?
(a) The Income Tax Act, 1961
(b) The Central Sales Tax Act, 1956
(c) The Central Excise Act, 1944
(d) The Central Goods and Services Tax Act, 2017

पर्यायी उत्तरे / Answer options :

(1) फक्त (d) / Only (d)
(2) फक्त (a) / Only (a)
(3) फक्त (a) आणि (d) / Only (a) and (d)
(4) फक्त (b) आणि (c) / Only (b) and (c)

185. जागतिकीकरणाचे मुख्य घटक कोणते ?
(a) देशाच्या सीमावर्ती भागात मालमुक्त प्रवाह करण्यास परवानगी देण्याकरीता व्यापारातील अडथळे कमी करणे.
(b) देशा देशांमध्ये भांडवल मुक्तप्रवाह होऊ शकते अशा वातावरणाची निर्मिती करणे.
(c) मुक्त तंत्रज्ञान प्रवाह निर्मितीसाठी वातावरण निर्मिती.
(d) वरीलपैकी सर्व

Which are the main parameters of Globalization ?
(a) Reduction of trade barriers so as to permit free flow of goods across the national frontiers.
(b) Creation of an environment in which free flow of capital can take place among nation states.
(c) Creation of environment, permitting free flow of technology.
(d) All of the above

पर्यायी उत्तरे / Answer options :

(1) (a) आणि (b) / (a) and (b)
(2) (b) आणि (c) / (b) and (c)
(3) (a) फक्त / (a) only
(4) (d) फक्त / (d) only

186. खालील विधाने विचारात घ्या :
(a) नवव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट ‘समानता आणि सामाजिक न्यायासह वृद्धी’ होते.
(b) दहाव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट देशांतर्गत स्थूल उत्पादनात सरासरी वृद्धी 8% साध्य करणे.
(c) अकराव्या पंचवार्षिक योजनेत ‘जलद आणि अधिक समावेशक वृद्धीला’ महत्व देण्यात आले.

Consider the following statements :
(a) The Ninth Five Year Plan main aimed at ‘growth with social justice and equality’.
(b) The Tenth Five Year Plan objectives was to achieve an average growth rate of 8% on the GDP.
(c) The Eleventh Plan emphasized ‘faster and more inclusive growth’.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? / Which of the above statement/s is/are correct ?

(1) (a) व (b) / (a) and (b)
(2) (b) व (c) / (b) and (c)
(3) (a) व (c) / (a) and (c)
(4) वरीलपैकी सर्व / All of the above

187. नवीन आर्थिक धोरणामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही ?
(a) उदारीकरण          (b) खाजगीकरण          (c) राष्ट्रीयीकरण          (d) जागतिकीकरण

Which of the following is not included in New Economic Policy ?
(a) Liberalization          (b) Privatisation          (c) Nationalisation          (d) Globalization

पर्यायी उत्तरे / Answer options :

(1) फक्त (a) / Only (a)
(2) फक्त (b) / Only (b)
(3) फक्त (c) / Only (c)
(4) वरील सर्व / All of the above

188. खालील विधाने विचारात घ्या :
(a) 73 व्या व 74 व्या घटनादुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला.
(b) राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतींचे मजबुतीकरण करण्यासाठी सुरू केले.
(c) राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची योजना राज्य सरकार प्रायोजित आहे.

Consider the following statements :
(a) The 73rd and 74th Constitution Amendment Act provide constitutional status to the Panchayati Raj Institutions.
(b) The Rajiv Gandhi Panchayat Sashaktikaran Abhiyan (RGPSA) has been launched to strengthen panchayats across the country.
(c) The RGPSA is state government sponsored scheme.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त ? / Which of the above statement/s is/are incorrect ?

(1) (a) व (b) / (a) and (b)
(2) (b) व (c) / (b) and (c)
(3) फक्त (c) / only (c)
(4) फक्त (a) / only (a)

189. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने कमी करणे आहे.
(b) मंत्री परिषद ही सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ आहे.
(c) डिसेंबर 2005 मध्ये सहावी मंत्री परिषद दोहा येथे झाली होती.

Consider the following statements regarding to WTO :
(a) The purpose of WTO is to remove restrictions in International Trade.
(b) The highest decision making body is the Ministerial Conference.
(c) The sixth ministerial conference was held in Doha in Dec. 2005.

वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ? / Which of the statements given above is/are incorrect ?

(1) (a) व (b) / (a) and (b)
(2) (b) व (c) / (b) and (c)
(3) फक्त (b) / only (b)
(4) फक्त (c) / only (c)

190. डब्ल्यु टी ओ चे ‘दोहा फेरी’ खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
(a) कृषीचे उदारीकरण                  (b) उद्योगाचे उदारीकरण
(c) सेवा क्षेत्राचे उदारीकरण               (d) गुंतवणूकीचे उदारीकरण

‘Doha Round’ of WTO is related with issues, which of the following ?
(a) Liberalization of Agriculture                  (b) Liberalization of Industry
(c) Liberalization of Service Sector               (d) Liberalization of Investment

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ? / Which of the option given above is/are correct ?

(1) (a) फक्त / (a) only
(2) (b) आणि (c) फक्त / (b) and (c) only
(3) (a) आणि (c) फक्त / (a) and (c) only
(4) (d) फक्त / (d) only

191. ‘सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी’ यावर कोणत्या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला ?
Which of the Five Year Plan has focused on ‘Growth with Social Justice and Equality’ ?
(1) आठवी योजना / Eighth Plan
(2) नववी योजना / Ninth Plan
(3) दहावी योजना / Tenth Plan
(4) अकरावी योजना / Eleventh Plan

192. वस्तू व सेवा कराशी (GST) संबंधित घटनादुरुस्ती कोणती ?
Which of the Constitutional Amendment is concerned with Goods and Services Tax (GST) ?
(1) 98 वी घटनादुरुस्ती / 98th Constitutional Amendment
(2) 99 वी घटनादुरुस्ती / 99th Constitutional Amendment
(3) 100 वी घटनादुरुस्ती / 100th Constitutional Amendment
(4) 101 वी घटनादुरुस्ती / 101st Constitutional Amendment

193. ‘नवीन आर्थिक धोरण’ कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले ?
On which day, ‘New Economic Policy’ accepted ?
(1) 24 जून, 1990 / 24th June, 1990
(2) 24 जुलै, 1990 / 24th July, 1990
(3) 24 जून, 1991 / 24th June, 1991
(4) 24 जुलै, 1991 / 24th July, 1991

194. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पश्चिम जर्मनीच्या साहाय्याने 1959 मध्ये कोणता प्रकल्प राबविण्यात आला ?
(a) भिलाई पोलाद प्रकल्प                  (b) दुर्गापूर पोलाद प्रकल्प
(c) रुरकेला पोलाद प्रकल्प                  (d) वरीलपैकी सर्व

Which of the following projects was implemented in 1959 with the help of West Germany in Second Five Year Plan ?
(a) Bhilai Steel Project                  (b) Durgapur Steel Project
(c) Rourkela Steel Project                  (d) All of above

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ? / Which of the option given above is/are correct ?

(1) (a) फक्त / (a) only
(2) (c) फक्त / (c) only
(3) (a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
(4) (d) फक्त / (d) only

195. डंकेल प्रस्तावातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांना अल्पविकसित देशांमध्ये मुक्त प्रवेश मिळाला ?
As per the which provision of Dunkel Proposal, Multinational Corporations entered freely in Less Develop Countries ?
(1) TRIPS
(2) TRIMS
(3) वरील दोन्ही / Above both
(4) यापैकी एकही नाही / None of the above

196. अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ सांगा ?
State the period of Eleventh Five Year Plan.
(1) 2007 ते 2012 / 2007 to 2012
(2) 2012 ते 2017 / 2012 to 2017
(3) 2007/08 ते 2011/12 / 2007/08 to 2011/12
(4) 2006/07 ते 2010/11 / 2006/07 to 2010/11

197. खालील विधाने विचारात घ्या :
(a) महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने महिला धोरण तयार करून 1994 मध्ये जाहीर केले होते.
(b) 2014 मध्ये तिसरे महिला धोरण जाहीर केले होते.
(c) या धोरणांमध्ये महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष केंद्रित केले.

Consider the following statements :
(a) Maharashtra is the first state in India to formulate women policy which was declared in 1994.
(b) Third women policy was declared in 2014.
(c) These policies focused on reforms in economic conditions of women.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? / Which of the above statement/s is/are correct ?

(1) (a) व (b) / (a) and (b)
(2) (b) व (c) / (b) and (c)
(3) (a) व (c) / (a) and (c)
(4) वरीलपैकी सर्व / All of the above

198. बाराव्या पंचवार्षिक योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 रोजी आपल्या कितव्या बैठकीत मान्यता दिली ?
On 27th December 2012 in which meeting National Development Council approved the 12th Five-Year Plan ?
(1) 56
(2) 57
(3) 59
(4) 52

199. व्हॅट कोणावर लागू आहे ?
(a) थेट ग्राहकांवर
(b) उत्पादनाच्या अंतिम टप्प्यावर
(c) उत्पादनाच्या पहिल्या टप्प्यावर
(d) उत्पादन आणि अंतिम विक्री दरम्यान मूल्य वर्धनाच्या सर्व टप्प्यांवर

VAT is imposed :
(a) Directly on consumer
(b) On Final stage of Production
(c) On the First stage of Production
(d) On all stages of value addition between Production and Final sale

पर्यायी उत्तरे / Answer options :

(1) (a) फक्त / (a) only
(2) (a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
(3) (b) आणि (c) / (b) and (c)
(4) (d) फक्त / (d) only

200. 5 जून, 1966 रोजी भारतीय रुपयाचे किती टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आले ?
At what percent devaluation of Indian Rupees was done on 5th June, 1966 ?
(1) 33.5 टक्के / 33.5 percent
(2) 17.5 टक्के / 17.5 percent
(3) 19.5 टक्के / 19.5 percent
(4) 36.5 टक्के / 36.5 percent

MPSC कर सहाय्यक मुख्य परीक्षा २०१७ (भाग २) – उत्तरसूची (Answer Key: Q. 101 to 200)
प्र. क्र. उत्तर प्र. क्र. उत्तर प्र. क्र. उत्तर प्र. क्र. उत्तर
101 (4) 126 (3) 151 (2) 176 (2)
102 (3) 127 (4) 152 (3) 177 (2)
103 (3) 128 (3) 153 (1) 178 (3)
104 (3) 129 (3) 154 (2) 179 (2)
105 (1) 130 (2) 155 (3) 180 (2)
106 (1) 131 (3) 156 (4) 181 (3)
107 (1) 132 (1) 157 (2) 182 (3)
108 (3) 133 (3) 158 (3) 183 (4)
109 (3) 134 (3) 159 (4) 184 (2)
110 (3) 135 (2) 160 (2) 185 (4)
111 (2) 136 (2) 161 (4) 186 (4)
112 (4) 137 (3) 162 (4) 187 (3)
113 (1) 138 (1) 163 (3) 188 (3)
114 (4) 139 (2) 164 (4) 189 (4)
115 (3) 140 (1) 165 (2) 190 (3)
116 (2) 141 (3) 166 (2) 191 (2)
117 (1) 142 (2) 167 (2) 192 (4)
118 (4) 143 (1) 168 (4) 193 (4)
119 (2) 144 (3) 169 (3) 194 (2)
120 (4) 145 (4) 170 (3) 195 (3)
121 (2) 146 (4) 171 (1) 196 (1)
122 (4) 147 (1) 172 (2) 197 (4)
123 (3) 148 (3) 173 (3) 198 (2)
124 (4) 149 (1) 174 (2) 199 (4)
125 (3) 150 (2) 175 (1) 200 (4)