🏠 होम पेज 📢 Latest जॉब्स 📥 ADMIT कार्ड 🏆 RESULT करंट अफेयर्स Q 💬 FeedBack
WhatsApp Join Telegram Join

महाराष्ट्र जॉब्स | सर्व जिल्हा अपडेट & ऑल सेंटर/प्राइवेट जॉब्स

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक, गट-क (मुख्य) परीक्षा – 2017

परीक्षा दि. 31/12/2017 | प्रश्नपुस्तिका क्रमांक: X10

विषय: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणितीय कौशल्य आणि पुस्तपालन व लेखाकर्म

एकूण प्रश्न : 200 | एकूण गुण : 400 | वेळ : 2 तास

1. ‘शामा चित्र काढत राहील.’ या वाक्याचा काळ ओळखा.
(1) साधा भविष्यकाळ
(2) रीति भविष्यकाळ
(3) पूर्ण भविष्यकाळ
(4) साधा वर्तमानकाळ

2. पुढीलपैकी सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते ?
(अ) सुनील उद्या पुण्याला जाईल.
(ब) अनुराग निबंध लिहितो.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (अ) बरोबर
(2) (अ) आणि (ब) बरोबर
(3) फक्त (ब) बरोबर
(4) (अ) आणि (ब) चूक

3. योग्य जोड्या लावा.
(अ) रेडा          (i) कालवड
(ब) बैल          (ii) भाटी
(क) बोका         (iii) म्हैस
(ड) खोंड          (iv) गाय
पर्यायी उत्तरे :
      ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
(1) (ii) (iii) (i) (iv)
(2) (iv) (i) (iii) (ii)
(3) (i) (ii) (iv) (iii)
(4) (iii) (iv) (ii) (i)

4. पुढील विधाने वाचा.
(अ) संयुक्त वाक्यात प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
(ब) मिश्रवाक्य गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी बनते.
(क) मिश्र संयुक्त वाक्यासाठी कोणत्याच उभयान्वयी अव्ययांची आवश्यकता नसते.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (अ) चूक
(2) फक्त (अ) व (ब) चूक
(3) फक्त (क) चूक
(4) फक्त (अ) व (क) चूक

5. ‘राजकीय नेते फक्त लेखनात शूरपणा दाखवतात.‘ अधोरेखित शब्दासाठी वाक्प्रचार ओळखा.
(1) गुण उधळणे
(2) कागदी घोडे नाचविणे
(3) चुरमुरे खात बसणे
(4) जीवाची उलघाल होने

6. नवरा, संसार किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागणे असा अर्थ व्यक्त करणारी म्हण ओळखा.
(1) त्यालकार रहता म्हणान नालकार रहता
(2) तोंडाच्यो वाता आणि भोक मागान खाता
(3) घोव नाय धगड नि हातपाय रगडा
(4) घराक नाय घरतो आणि धेंगा जाली वरती

7. पुढील वाक्यातील विशेषनाम ओळखा.
‘माधुरी उद्या मुंबईला जाईल.’
(1) उद्या
(2) मुंबईला
(3) जाईल
(4) माधुरी

8. Antinational या पारिभाषिक शब्दाचा मराठीतील अर्थ काय ?
(1) देशप्रेमी
(2) निवासी भारतीय
(3) देशाचा नागरिक
(4) राष्ट्रद्रोही

9. ‘आयदाना’ या शब्दाचा अर्थ सांगा.
(1) आमंत्रण
(2) जेवणासाठी लागणारी भांडी
(3) पायपुसणी
(4) झाडू

10. प्रयोजक क्रियापदात ________.
(अ) कर्ता स्वतः क्रिया करीत असतो.
(ब) कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो.
(क) क्रियापदाला ‘आव’ किंवा ‘आवव’ हे प्रत्यय लागतात.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) व (ब) बरोबर
(2) फक्त (अ) चूक
(3) फक्त (ब) व (क) चूक
(4) फक्त (अ) व (क) चूक

11. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा ________ अलंकार होतो.
(1) अनुप्रास
(2) यमक
(3) श्लेष
(4) अर्थालंकार

12. पुढीलपैकी प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांच्या पोटप्रकारांपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे योग्य उदाहरण कोणते ?
(1) तुम्ही त्याचा अपमान केला; याकरिता तो तुमच्याकडे येत नाही
(2) आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक
(3) तू ये किंवा न ये, मी जाणारच
(4) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली

13. विधेय म्हणजे –
(1) कर्म
(2) पूरक
(3) कर्ता
(4) क्रियापद

14. तंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेत ?
(1) अरबी
(2) फारसी
(3) पोर्तुगीज
(4) तेलगू

15. अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा.
(1) दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं.
(2) श्‍वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ.
(3) येथे समस्त बहिरै बसतात लोक का भापणे मधुर तू करिशी अनेक।
(4) गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले।

16. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या म्हणीच्या विरुद्ध असणारी म्हण ओळखा.
(1) नाव मोठे लक्षण खोटे
(2) बोलण्याचा भात बोलाचीच कढी
(3) भरवशाच्या म्हशीला टोणगा
(4) पुढे तिखट मागे पोचट

17. ‘रामाला शेळीचे दूध आवडते’ – या वाक्यातील ‘दूध’ हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवितो ?
(1) कर्ता
(2) क्रियापद
(3) कर्म
(4) अव्यय

18. खाली दिलेल्या जोड्या लावा.
(अ) गट :
(अ) भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र
(ब) पूर्ण अर्थाचे बोलणे
(क) ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो
(ड) स्पष्ट व खणखणीत उच्चार

(ब) गट :
(i) अनुस्वार
(ii) ऱ्हस्वस्वर
(iii) व्याकरण
(iv) वाक्य

पर्यायी उत्तरे :
      ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

(1) (iii) (iv) (i) (ii)
(2) (iii) (iv) (ii) (i)
(3) (iii) (ii) (iv) (i)
(4) (ii) (i) (iv) (iii)

19. संयुक्त वाक्य ओळखा.
(1) लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात.
(2) लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत.
(3) लोकांनी आपली स्तुती, निंदा करावी .
(4) लोक आपली स्तुती करतात कारण निंदा ही करतात.

20. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.
(1) राजेश रडत होता
(2) राजेश रडला होता
(3) राजेश रडत असे
(4) राजेश रडला

21. विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार ________.
(1) नायटा
(2) नारकत
(3) नालकी
(4) नावदार

22. वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?
(1) अपसरण चिन्ह
(2) संयोग चिन्ह
(3) अपूर्ण विराम
(4) स्वल्प विराम

23. ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
(1) उपमा
(2) रूपक
(3) उत्प्रेक्षा
(4) यमक

24. शेजारचे घर पावसाळ्यात गळते. – या वाक्याचा प्रकार ओळखा.
(1) संयुक्तवाक्य
(2) नकारार्थी वाक्य
(3) केवलवाक्य
(4) मिश्रवाक्य

25. शुद्ध शब्द ओळखा.
(1) अध्यात्मीक
(2) आध्यात्मकि
(3) अध्यात्मिक
(4) आध्यात्मिक

26. अकारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन ________ होते.
(1) आकारान्त
(2) याकारान्त
(3) ईकारान्त
(4) वाकारान्त

27. ‘तुला पहिले बक्षिस मिळावे’ या वाक्याचे विद्यार्थी वाक्यरूपांतर ओळखा.
(1) तुला पहिले बक्षिस मिळावे
(2) तुला पहिले बक्षिस मिळाले
(3) तुला पहिले बक्षिस मिळेल
(4) तुला पहिले बक्षिस मिळते

28. पुढे काही वर्णप्रकार दिलेले आहेत. त्यांचा अचूक क्रम ओळखा.
‘श, क्, ह, व्’
(1) स्पर्श, महाप्राण, अर्धस्वर, उष्मे
(2) उष्मे, स्पर्श, महाप्राण, अर्धस्वर
(3) महाप्राण, अर्धस्वर, स्पर्श, उष्मे
(4) अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्पर्श

29. ‘मंदाक्रान्ता’ या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?
(1) 14
(2) 15
(3) 17
(4) 18

30. पुढे काही जोडशब्द दिले आहेत. त्यातील अनुक्रमे स्वरसंधी ओळखा.
‘महिलाश्रम, सूर्यास्त, विद्यार्थी, देवालय’
(1) आ+अ, अ+आ, आ+आ, अ+अ
(2) अ+अ, आ+आ, आ+अ, अ+आ
(3) आ+आ, अ+अ, आ+अ, अ+आ
(4) अ+आ, आ+अ, अ+अ, आ+आ

31. पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते ?
(1) मी स्वतः त्याला पाहिले
(2) कोणी-कोणास हसू नये
(3) तो आपण होऊन माझ्याकडे आला
(4) तू स्वतः मोटार हाकशील का ?

32. पुढीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते ?
(अ) आई त्या मुलाला हसविते
(ब) मला आता काम करवते
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (अ) योग्य
(2) फक्त (ब) योग्य
(3) (अ) आणि (ब) योग्य
(4) (अ) आणि (ब) अयोग्य

33. ‘ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा.’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
(1) ज्ञानी
(2) पंडित
(3) विद्वान
(4) बहुश्रुत

34. ‘साधा पण गुणी मनुष्य’ या अर्थाशी संबंधित वाक्प्रचार लिहा.
(1) घागरगडचा सुभेदार
(2) झाकले माणिक
(3) उंबराचे फूल
(4) ओनामा

35. ‘फारच दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व घटना’ – या शब्दसमूहासाठी खालील योग्य त्या वाक्प्रचाराचा पर्याय लिहा.
(1) गंगेत घोडे नहाणे
(2) डोळ्याचे पारणे फिटणे
(3) अंगारकोचा योग
(4) कपिलाषष्ठीचा योग

36. ‘तू जेथे गेला होतास तिथेच तो सुद्धा गेला आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
(1) संयुक्तवाक्य
(2) केवलवाक्य
(3) संकेतार्थीवाक्य
(4) मिश्रवाक्य

37. खाली दिलेल्या वाक्यातून केवलवाक्य नसलेले वाक्य ओळखा.
(1) खूप अभ्यास केल्यामुळे प्रभाला उज्ज्वल यश मिळाले.
(2) देवळात प्रभाने स्वतःभोवती गिरकी घेऊन देवाला नमस्कार केला.
(3) प्रभाने पाठवलेल्या डब्यात गोड पदार्थ होते.
(4) प्रभाने डबा उघडला तेव्हा त्यात गोड पदार्थ होते.

38. पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.
‘पीठभाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊबहीण’
(1) स्त्री, नपुंसक, पुल्लिंग, स्त्री
(2) नपुंसक, स्त्री, स्त्री, पुल्लिंग
(3) पुल्लिंग, पुल्लिंग, स्त्री, नपुंसक
(4) पुल्लिंग, नपुंसक, स्त्री, स्त्री

39. पुढे काही विधाने दिली आहेत. त्या आधारे योग्य पर्याय निवडा.
(अ) स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत.
(ब) व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची आहेत.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (अ) बरोबर
(2) फक्त (ब) बरोबर
(3) (अ) आणि (ब) बरोबर
(4) (अ) आणि (ब) चूक

40. ‘तो कुठेही न थांबता बोलला’. या नकारात्मक वाक्याला होकारात्मक वाक्यात रूपांतरित करा.
(1) तो भराभर बोलला
(2) तो सलग बोलला
(3) तो अस्खलित बोलला
(4) तो हुशारीने बोलला

41. Identify the unit in which there is an error :
Many people are painting their houses white these days
              (a)                        (b)                   (c)
(1) only – (a)
(2) only – (b)
(3) only – (c)
(4) No error

42. Change the following into interrogative :
‘She drew a picture’.
(1) Was she drawing an picture ?
(2) Have she drawn a picture ?
(3) Did she draw a picture ?
(4) Has she draw a picture ?

43. Fill in the blank with the correct form of the tense given in bracket.
Reena did not go to school yesterday as she ________ (finish) her homework.
(1) had not finished
(2) have not finished
(3) has not finished
(4) will not finished

44. Identify the correct figure of speech in the given lines.
Alone, alone, all, all alone
Alone on a wide, wide sea
(1) Personification
(2) Alliteration
(3) Apostrophe
(4) Irony

45. Change the following into indirect speech :
She said to him, “I know you.”
(1) She said to him that I knew him.
(2) She said to him that she knew me.
(3) She said to him that she knew him.
(4) She said to him that she knows him.

46. Choose the most suitable word opposite in meaning of the word :
‘Casual’
(1) accidental
(2) formal
(3) informal
(4) systematic

47. Find out the incorrect sentence from the following :
(1) Fifty thousand rupees is a big amount.
(2) Ten miles are not a short distance.
(3) Five years is a long period.
(4) One of the books is damaged.

48. Complete the following sentence by choosing the correct phrasal verb :
She is very strong. She does not ________ easily.
(1) give in
(2) give up
(3) give out
(4) give away

49. Choose the right option for the following underlined idiom.
I am prepared to meet you half-way.
(1) Come to discuss with you.
(2) Come to a compromise with you.
(3) Come to celebrate with you.
(4) Come to fight with you.

50. Fill in the blank with correct preposition :
He has been in hospital ________ last week.
(1) in
(2) for
(3) since
(4) from

51. Fill the blanks from the options given below.
It ________ already ________ raining when I ________ an umbrella.
(1) stopped, brought, had
(2) had, brought, stopped
(3) brought, stopped, had
(4) had, stopped, brought

52. Choose the correct option to fill in the blank :
My eyes are aching now because I ________ since morning.
(1) am reading
(2) have read
(3) have been reading
(4) read

53. Identify the part of speech of the underlined word :
He is an idle boy, he does not work.
(1) Noun
(2) Verb
(3) Adjective
(4) Adverb

54. Select the word which means the same as the following group of words :
‘One who does not believe in God.’
(1) Unreligious
(2) Atheist
(3) Pagan
(4) Theist

55. Complete the following sentence by using the correct option :
Man is related to shout in the same way crow is related to ________.
(1) caw
(2) chirp
(3) mutter
(4) mob

56. Find out the word that is misspelt :
(1) Believe
(2) Relieve
(3) Grieve
(4) Decieve

57. A word is spelt in four different ways, out of which only one is correct. Find the correctly spelt word :
(1) Commettee
(2) Committe
(3) Comittee
(4) Committee

58. Kolkata is more populous than most other cities of India.
Which of the following option is correctly converted from the above sentence.
(1) Kolkata is the most popular city of India.
(2) There is no other city in India as populous as Kolkata.
(3) Some other cities of India are not more populous than Kolkata.
(4) Kolkata is one of the most populous cities of India.

59. Choose the correct word which expresses the meaning of the underlined word in the following sentence :
She looked at the physically challenged children with contempt.
(1) hatred
(2) disrespect
(3) pity
(4) sympathy

60. Fill in the blank by choosing the correct alternative :
Is that my book, or is it ________ ?
(1) Your
(2) Your’s
(3) Yours
(4) Your’s book

61. Choose the correct pair of articles to fill in the blanks :
He was ________ honest man but ________ people in the neighbourhood did not like him.
(1) a, the
(2) the, a
(3) an, the
(4) the, the

62. Choose the right option given below. Convert the following into indirect speech.
“Have you finished your lesson, Hari ?” Said Mr. Sharma to his son.
(1) Mr. Sharma said to Hari if he had finished his lesson.
(2) Mr. Sharma said to his son Hari that have you finished your lesson.
(3) Mr. Sharma asked his son Hari whether he had finished his lesson.
(4) Mr. Sharma enquired of his son Hari that whether had he finished his lesson.

63. Arrange the following sentences in proper sequence.
(a) He gives raw materials for many industries.
(b) If the agriculture fails, the industry fails and the whole national economy collapses.
(c) The farmer is the very backbone of our national economy.
(d) He gives food to the nation.
Answer options :
(1) (c), (a), (d), (b)
(2) (d), (b), (c), (a)
(3) (c), (d), (a), (b)
(4) (b), (d), (a), (c)

64. Fill in the blank with the correct word from the given options :
Walking twenty kilometres non-stop is quite a ________
(1) feat
(2) feet
(3) fit
(4) foot

65. Match (A) and (B) to make four meaningful sentences :
(A)
(a) Never talk
(b) We marched back
(c) The farmer left his fields
(d) His soul has reached

(B)
(i) After the match had been over
(ii) When the sun had set
(iii) Where from it cannot return
(iv) While you are at meals

Answer options :
      ( a ) ( b ) ( c ) ( d )

(1) (iv) (i) (ii) (iii)
(2) (iii) (ii) (i) (iv)
(3) (i) (ii) (iii) (iv)
(4) (iv) (iii) (ii) (i)

66. Choose the meaning of the underlined idiom :
She’s a great singer. She’ll make it big one day.
(1) become rich
(2) become famous
(3) become popular
(4) make the record

67. Identify the unit in which there is an error :
There is Several reasons for your mistakes
       (a)               (b)                     (c)
(1) only – (a)
(2) only – (b)
(3) only – (c)
(4) No error

68. Choose the alternative that indicates correct meaning of the underlined word :
Inspite of the financial constraint, Vishal started his business and very soon became a successful industrialist.
(1) Freedom
(2) Restriction
(3) Support
(4) Promise

69. Pick out the correct sentence from the following :
(a) The drought in this year is very serious.
(b) What has he been doing from Tuesday ?
(c) He will return at midnight.
(d) I met him on last Monday.
Answer options :
(1) (a) and (b) are correct
(2) (c) and (d) are correct
(3) only (c) is correct
(4) only (c) is incorrect

70. Identify the kind of sentence given below :
She must weep or she will die.
(1) Simple sentence
(2) Compound sentence
(3) Complex sentence
(4) Compound – Complex sentence

71. Fill in the blank with appropriate pair of prepositions :
Jawaharlal Nehru was born ________ Allahabad ________ Uttar Pradesh.
(1) at, in
(2) in, at
(3) in, from
(4) in, in

72. Fill in the blank with the correct phrasal verb from the given options :
I was ________ his behaviour.
(1) shocked for
(2) shocked on
(3) shocked from
(4) shocked at

73. Which of the following pairs of antonyms is incorrect :
(a) Accept × Reject
(b) Bloom × Fade
(c) Defend × Suspend
(d) Progress × Regress
Answer options :
(1) (a) only
(2) (a) and (b)
(3) (c) only
(4) (c) and (d)

74. Fill in the blank :
My Father ________ me to go to picnic with my friends.
(1) aloud
(2) allowed
(3) pray
(4) prey

75. Fill in the blank with the correct word choosing from the given options :
The ________ of our house was leaking because of heavy rain.
(1) Sealing
(2) Ceiling
(3) Sailing
(4) Celling

76. Choose the right option for the following underlined idiom.
Today he is in high spirits.
(1) Fearful
(2) Joyful
(3) Hopeful
(4) Greatful

77. Identify the correct meaning of the expression :
viz.
(1) Namely
(2) Contrary
(3) In fact
(4) In short

78. Identify the correct sentence from the following :
(1) Death is preferable than dishonour.
(2) Death is preferable to dishonour.
(3) Dying is preferable to dishonour.
(4) Dying is most preferable to dishonour.

79. Choose from the given alternatives the word which is opposite in meaning of the underlined word :
He issues only verbal orders to escape the inquiry against those orders in future.
(1) Oral
(2) Vague
(3) Informal
(4) Written

80. Identify the correct and incorrect sentence from the following :
(a) One of the boys told me about Asha’s result.
(b) He has only one woolen trouser.
Answer options :
(1) (a) is correct (b) is incorrect
(2) (b) is correct (a) is incorrect
(3) Both (a) and (b) are correct
(4) Both (a) and (b) are incorrect

81. जोड्या लावा :
(a) महाराजा सयाजीराव गायकवाड      (i) न्यायपक्षाची स्थापना
(b) पी. त्यागराज आणि टी.एम्. नायर       (ii) ‘विटाळ विध्वंसन’ ग्रंथाचे लेखन
(c) गोपाळ बाबा वलंगकर                      (iii) चोखामेळा सुधारणा मंडळाची स्थापना
(d) किसन फागुजी बनसोडे                   (iv) अस्पृश्यता निवारक परिषदेचे आयोजन

Match the following :
(a) Maharaja Sayajirao Gaikwad      (i) Establishment of Justice Party
(b) P. Tyagrao and T.M. Nair             (ii) Writing of scripture of ‘Vital Vidhvansan’
(c) Gopal Baba Walangkar                  (iii) Establishment of ‘Chokha Mela Development Mandal’
(d) Kisan Faguji Bansode                  (iv) Organization of Council for Eradication of untouchability

पर्यायी उत्तरे / Answer Options :
      ( a ) ( b ) ( c ) ( d )

(1) (iv) (i) (ii) (iii)
(2) (iii) (iv) (i) (ii)
(3) (ii) (i) (iv) (iii)
(4) (i) (iii) (iv) (ii)

82. भारत छोडो चळवळीमध्ये ________ यांनी सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली.
________ established parallel government in Satara during the Quit India Movement.
(1) नरदेव शास्त्री / Nardev Shastri
(2) उमाजी नाईक / Umaji Naik
(3) गणपतराव कथळे / Ganpatrao Kathle
(4) नाना पाटील / Nana Patil

83. ‘ब्रदर्स-इन-लॉ’ म्हणून कोणास ओळखले जाते ?
(a) फिरोजशहा मेहता – बदरुद्दीन तय्यबजी – काशीनाथ तेलंग
(b) दिनशा वाच्छा – दादाभाई नौरोजी – शिवराम साठे
(c) रामचंद्र साने – सिताराम चिपळूणकर – गोपाळकृष्ण गोखले
(d) कृष्णाजी नुलकर – नारायण चंदावरकर – गंगाराम मस्के
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

Who are known as ‘Brothers-in-Law’ ?
(a) Phirozshah Mehta – Badruddin Tayyabaji – Kashinath Telang
(b) Dinsha Wachha – Dadabhai Nauroji – Shivram Sathe
(c) Ramchandra Sane – Shitaram Chiplunkar – Gopalkrishna Gokhale
(d) Krishnaji Nulkar – Narayan Chandavarkar – Gangaram Maske
Which of the statement/s given above is/are correct ?

(1) (a) आणि (b) फक्त / (a) and (b) only
(2) (a), (b) आणि (d) फक्त / (a), (b) and (d) only
(3) (a) फक्त / (a) only
(4) (a) आणि (c) फक्त / (a) and (c) only

84. आमचे नाव काय आहे ? बंड. आमचे काम काय आहे ? बंड. हे बंड कुठे होईल ? भारतात. अशी सुरुवात कोणत्या साप्ताहिकाने केली ?
Who started the weekly, stating that what is your name ? Mutiny. What is our work ? Mutiny. Where will Mutiny break out ? In India ?
(1) गदर / Gaddar
(2) धुमकेतू / Dhumketu (Comet)
(3) ज्ञानप्रकाश / Dyanprakash
(4) प्रभाकर / Prabhakar

85. जोड्या लावा :
(a) दादोबा पांडुरंग तर्खडकर        (i) ‘यमुना पर्यटन’ कादंबरीचे लेखन
(b) बाबा पदमजी                        (ii) ‘मुक्ती सदन’ संस्थेची सुरुवात
(c) पंडिता रमाबाई                     (iii) ‘सोशल सर्व्हिस लीग’ ची स्थापना
(d) ना. म. जोशी                        (iv) परमहंस सभेची स्थापना

Match the following :
(a) Dadoba Pandurang Tarkhadkar      (i) Writing of the Novel ‘Yamuna Paryatan’
(b) Baba Padamji                                   (ii) Beginning of Mukti-Sadan Sanstha
(c) Pandita Ramabai                             (iii) Establishment of Social Service League
(d) N.M. Joshi                                       (iv) Establishment of Paramhansa Sabha

पर्यायी उत्तरे / Answer Options :
      ( a ) ( b ) ( c ) ( d )

(1) (iii) (ii) (iv) (i)
(2) (ii) (iii) (iv) (i)
(3) (iv) (i) (ii) (iii)
(4) (iii) (iv) (i) (ii)

86. दिलेल्या जिल्ह्यांच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून लहान ते मोठा असा क्रमाने जो पर्याय दिला आहे, तो ओळखून योग्य पर्याय निवडा.
On the basis of size of the geographical area, identify the correct option arranged with the order from small to large size district. Choose that option for the correct answer.
(1) हिंगोली – सिंधुदुर्ग – गोंदिया – नंदुरबार
     Hingoli – Sindhudurg – Gondia – Nandurbar
(2) हिंगोली – गोंदिया – सिंधुदुर्ग – नंदुरबार
     Hingoli – Gondia – Sindhudurg – Nandurbar
(3) सिंधुदुर्ग – हिंगोली – नंदुरबार – गोंदिया
     Sindhudurg – Hingoli – Nandurbar – Gondia
(4) सिंधुदुर्ग – गोंदिया – हिंगोली – नंदुरबार
     Sindhudurg – Gondia – Hingoli – Nandurbar

87. चंद्रपूरमधील नागभिड येथे कोणता उद्योग आहे ?
Which industry is found at Nagbhid in Chandrapur ?
(1) लुगडी / Lugdi
(2) रेशम कापड / Resham cloth
(3) लाकडी खेळणी / Wood toys
(4) चादरी / Blanket (chadri)

88. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या दिनांक 9.11.17 च्या आकडेवारीनुसार, खाली दिलेल्यांपैकी अशा कोणत्या दोन विभागांमध्ये जून 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत त्या त्या विभागाच्या सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या 90% पेक्षा जास्त पर्जन्य झाल्याची नोंद झाली ?
According to the Department of Agriculture, Government of Maharashtra data of 9.11.17, which of the following two divisions received more than 90% rainfall to their normal rainfall between June 2017 and October 2017 ?
(1) पुणे व नागपूर / Pune and Nagpur
(2) पुणे व अमरावती / Pune and Amravati
(3) कोकण व नाशिक / Konkan and Nasik
(4) औरंगाबाद व नागपूर / Aurangabad and Nagpur

89. नागरी नोंदणी प्रणाली (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम), 2015 च्या अहवालाप्रमाणे, जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक म्हणून दादर-नगर हवेली (1001), त्या पाठोपाठ त्रिपुरा (1000), मेघालय (975) आणि ________ (973) येथे नोंदविले गेले आहे.
According to the report of Civil Registration System, 2015, sex ratio at birth has been recorded as a highest at Dadar – Nagar Haveli (1001), followed by Tripura (1000), Meghalaya (975) and ________ (973).
(1) महाराष्ट्र व केरळ / Maharashtra and Kerala
(2) गोवा व छत्तीसगड / Goa and Chhattisgarh
(3) सिक्कीम व मिझोराम / Sikkim and Mizoram
(4) पुडुचेरी व आंध्र प्रदेश / Puducherry and Andhra Pradesh

90. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे व त्यांचे स्थान असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
(a) माथेरान         (i) सिंधुदुर्ग
(b) चिखलदरा       (ii) नंदुरबार
(c) तोरणमाळ       (iii) रायगड
(d) आंबोली          (iv) अमरावती

Match the pairs of Hill Stations and its locational district in Maharashtra.
(a) Matheran        (i) Sindhudurg
(b) Chikhaldara     (ii) Nandurbar
(c) Toranmal         (iii) Raigad
(d) Amboli            (iv) Amravati

पर्यायी उत्तरे / Answer Options :
      ( a ) ( b ) ( c ) ( d )

(1) (iii) (i) (ii) (iv)
(2) (iii) (iv) (ii) (i)
(3) (i) (ii) (iii) (iv)
(4) (ii) (iv) (i) (iii)

91. महाराष्ट्रामध्ये पहिली सुतगिरणी ________ यांनी ________ साली सुरू केली.
In Maharashtra first cotton textile mill was started by ________ in ________.
(1) कामराज दावर – 1855 / Kamraj Dawar – 1855
(2) जमशेदजी टाटा – 1854 / Jamshedji Tata – 1854
(3) कावसजी दावर – 1854 / Kawasaji Dawar – 1854
(4) जीजीभाई टाटा – 1855 / Jijibhai Tata – 1855

92. खाली दिलेल्या प्रमुख नद्या त्यांच्या उपनदीशी जुळवा आणि खाली दिलेल्यांमधून योग्य पर्याय निवडा.
प्रमुख नदी              तिची उपनदी
(a) गोदावरी              (i) निरा
(b) नर्मादा               (ii) जगबुडी
(c) भिमा                 (iii) येरळा
(d) वशिष्ठी               (iv) आसना
                              (v) उदाई

Match the given main river with its tributary and choose the correct option given below :
Main River              Tributary River
(a) Godavari              (i) Nira
(b) Narmada             (ii) Jagbudi
(c) Bhima                 (iii) Yerala
(d) Vashishthi            (iv) Aasana
                              (v) Udai

पर्यायी उत्तरे / Answer Options :
      ( a ) ( b ) ( c ) ( d )

(1) (iv) (ii) (iii) (i)
(2) (ii) (iii) (iv) (i)
(3) (ii) (iv) (iii) (i)
(4) (iv) (v) (i) (ii)

93. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास ________ म्हणतात.
The water storage of Koyana project in Maharashtra is known as ________.
(1) नाथसागर / Nathsagar
(2) शिवसागर / Shivsagar
(3) यशवंतसागर / Yashwantsagar
(4) नलदमयंतीसागर / Naldamyantisagar

94. खालील विधाने पहा :
(a) महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
(b) सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात चिनुक वाऱ्यापासून पाऊस पडतो.
(c) महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली येथे पडतो.

Observe the following statements :
(a) The climate of Maharashtra is tropical Monsoon type.
(b) Maharashtra receives rainfall between September to October from Chinuk winds.
(c) Amboli receive highest rainfall in Maharashtra.

पर्यायी उत्तरे / Answer Options :

(1) फक्त विधान (a) बरोबर आहे. / Only statement (a) is correct.
(2) फक्त विधान (c) बरोबर आहे. / Only statement (c) is correct.
(3) विधान (a) आणि (c) बरोबर आहेत. / Statement (a) and (c) are correct.
(4) विधान (a) आणि (b) बरोबर आहेत. / Statement (a) and (b) are correct.

95. महाराष्ट्रातील नद्यांच्या काठावरील शहरे व नद्या यांच्या योग्य जोड्या लावा.
शहर              नदी
(a) पंढरपूर          (i) पांझरा
(b) कोल्हापूर       (ii) कयाधू
(c) धुळे              (iii) भीमा
(d) हिंगोली          (iv) पंचगंगा

Match the pairs of river bank city and river in Maharashtra.
City              River
(a) Pandharpur     (i) Panzara
(b) Kolhapur        (ii) Kayadhu
(c) Dhule             (iii) Bheema
(d) Hingoli           (iv) Panchganga

पर्यायी उत्तरे / Answer Options :
      ( a ) ( b ) ( c ) ( d )

(1) (i) (iii) (iv) (ii)
(2) (iii) (ii) (i) (iv)
(3) (ii) (i) (iii) (iv)
(4) (iii) (iv) (i) (ii)

96. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे ?
Which of the following Articles of the Indian Constitution is related to the uniform civil code ?
(1) कलम 44 / Article 44
(2) कलम 40 / Article 40
(3) कलम 51 / Article 51
(4) कलम 32 / Article 32

97. मूळ घटनेत ‘संपत्तीचा अधिकार’ मूलभूत अधिकार होता. कोणत्या वर्षी कोणत्या घटनादुरुस्तीने हा अधिकार मूलभूत अधिकाराच्या प्रकरणातून वगळण्यात आला ?
In the original constitution, ‘Right to Property’ was a fundamental right. In which year and according to which constitutional amendment this right was removed from the chapter on fundamental rights ?
(1) 1971, 25 वी घटनादुरुस्तीने / 1971, 25th amendment
(2) 1976, 42 वी घटनादुरुस्तीने / 1976, 42nd amendment
(3) 1978, 44 वी घटनादुरुस्तीने / 1978, 44th amendment
(4) 1993, 74 वी घटनादुरुस्तीने / 1993, 74th amendment

98. कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबीर आयोजित करण्यात आले ?
In which State, the First Lok Adalat Camp was organized ?
(1) महाराष्ट्र / Maharashtra
(2) गुजरात / Gujarat
(3) आंध्र प्रदेश / Andhra Pradesh
(4) राजस्थान / Rajasthan

99. भारत-आसियान युवा परिषद- 2017, भारतात कोणत्या शहरात भरविण्यात आली ?
In which city of India the India-ASEAN Youth Summit – 2017 was held ?
(1) कलकत्ता / Calcutta
(2) मुंबई / Mumbai
(3) भोपाळ / Bhopal
(4) चेन्नई / Chennai

100. खालीलपैकी कोणते/ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 51-अ नुसार मूलभूत कर्तव्य आहे/त ?
(a) स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.
(b) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांचे संवर्धन करणे.
(c) देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे.

Which of the following is/are the fundamental duties as per Art. 51-A of the Indian Constitution ?
(a) To cherish and follow the noble ideas which inspired our national struggle for freedom.
(b) To promote international peace and security.
(c) To defend and serve the country.

योग्य पर्याय निवडा / Select the proper code :

(1) (a) आणि (b) / (a) and (b)
(2) (a) आणि (c) / (a) and (c)
(3) फक्त (c) / only (c)
(4) वरील सर्व / All the above

MPSC कर सहाय्यक मुख्य परीक्षा २०१७ (भाग १) – उत्तरसूची (Answer Key: Q. 1 to 100)
प्र. क्र. उत्तर प्र. क्र. उत्तर प्र. क्र. उत्तर प्र. क्र. उत्तर
1 (3) 26 (3) 51 (4) 76 (2)
2 (1) 27 (1) 52 (3) 77 (1)
3 (4) 28 (2) 53 (3) 78 (2)
4 (2) 29 (3) 54 (2) 79 (4)
5 (3) 30 (1) 55 (1) 80 (1)
6 (1) 31 (2) 56 (4) 81 (1)
7 (2) 32 (1) 57 (4) 82 (4)
8 (4) 33 (4) 58 (4) 83 (3)
9 (2) 34 (2) 59 (2) 84 (1)
10 (1) 35 (4) 60 (3) 85 (3)
11 (3) 36 (4) 61 (3) 86 (1)
12 (2) 37 (4) 62 (3) 87 (2)
13 (4) 38 (1) 63 (3) 88 (3)
14 (1) 39 (3) 64 (1) 89 (3)
15 (3) 40 (3) 65 (1) 90 (2)
16 (2) 41 (4) 66 (2) 91 (3)
17 (1) 42 (3) 67 (1) 92 (4)
18 (4) 43 (1) 68 (2) 93 (2)
19 (3) 44 (2) 69 (3) 94 (3)
20 (2) 45 (3) 70 (2) 95 (4)
21 (1) 46 (2) 71 (1) 96 (1)
22 (3) 47 (2) 72 (4) 97 (3)
23 (3) 48 (1) 73 (3) 98 (2)
24 (3) 49 (2) 74 (2) 99 (3)
25 (4) 50 (3) 75 (2) 100 (2)