विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क (पूर्व) परीक्षा – 2017
परीक्षा दि. 20/08/2017 | प्रश्नपुस्तिका क्रमांक: U09
विषय: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
एकूण प्रश्न : 100 | एकूण गुण : 100 | वेळ : 1 तास
1. पुढील उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा. ‘आज गाडीत कोण गर्दी !’
(1) आज गाडीत अतोनात गर्दी होती.
(2) आज गाडीत गर्दी होती.
(3) आज गाडीत गर्दी होती का ?
(4) आज गाडीत फारच गर्दी असणार.
2. पुढील वाक्यप्रकाराचा अनुक्रम ओळखा. ‘मी शाळेस येणार नाही, कारण मला ताप आला आहे.’ ‘मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही.’ ‘मला ताप आला आहे म्हणून मी शाळेस जाणार नाही.’
(1) केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य
(2) केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य
(3) मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य
(4) संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य
3. पुढील प्रश्नार्थक वाक्याचे योग्य होकारार्थी वाक्य तयार करा. ‘भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे ?’
(1) भारतीय संघ अजिंक्य असावा.
(2) भारतीय संघच अजिंक्य असू शकतो.
(3) भारताशिवाय कोणताच संघ अजिंक्य नाही.
(4) फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे.
4. ‘तडाग’ या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता ?
(1) तलाव
(2) पय
(3) सरोवर
(4) कासार
5. योग्य जोड्या लावा :
अ. कमळ
i. तम
ब. काळोख
ii. अहन्
क. चंद्र
iii. पदम
ड. दिवस
iv. इंदू
(1) i, ii, iii, iv
(2) ii, iii, i, iv
(3) iii, i, iv, ii
(4) iv, i, iii, ii
6. दोन केवल वाक्ये प्रधानबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा अशा जोड वाक्यास काय म्हणतात ?
(1) मिश्र वाक्य
(2) अकरणरूपी वाक्य
(3) संयुक्त वाक्य
(4) करणरूपी वाक्य
7. जोड्या जुळवा :
अ. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये
I. सबब, याकरिता
ब. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये
II. पण, बाकी
क. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये
III. अथवा, अगर
ड. परिणामबोधक उभयान्वयी अव्यये
IV. आणि, व
(1) IV, II, III, I
(2) IV, III, II, I
(3) III, I, IV, II
(4) II, I, IV, III
8. विभक्ती व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा :
अ. द्वितीया
I. क्रियेचा आरंभ होतो ती वस्तू किंवा स्थान
ब. पंचमी
II. क्रिया ज्या स्थानी घडली ते स्थान किंवा वेळ
क. षष्ठी
III. क्रिया ज्यावर घडली तो/ते
ड. सप्तमी
IV. एका पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध
(1) III, I, IV, II
(2) III, I, II, IV
(3) III, II, IV, I
(4) II, I, IV, III
9. दररोज, गावोगाव, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत ?
(1) अव्ययीभाव समास
(2) द्वंद्व समास
(3) कर्मधारय समास
(4) मध्यमपदलोपी समास
10. पुढील नकारार्थी वाक्याचे अचूक होकारार्थी वाक्य तयार करा. ‘अपमान केल्यास कुणाला राग येत नाही ?’
(1) अपमान केल्यास राग येतो.
(2) अपमानाने प्रत्येकाला राग येत असतो.
(3) अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.
(4) अपमानाने सर्वांना राग येतो.
11. खालील पर्यायांपैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा.
(1) पेशवा
(2) डबा
(3) मेहनत
(4) बटाटा
12. खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा.
(1) जेजे
(2) डावपेच
(3) समोरासमोर
(4) तुकडेतुकडे
13. ‘मुले घरी गेली’ – या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा.
(1) विध्यर्थी
(2) आज्ञार्थी
(3) मिश्र
(4) स्वार्थी
14. ‘ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा.’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
(1) विद्वान
(2) हुशार
(3) बहुश्रुत
(4) ज्ञानी
15. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही ? या विधानातील अधोरेखित शब्दाच्या आधारे वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा.
(1) उपमा
(2) उत्प्रेक्षा
(3) श्लेष
(4) यमक
16. पुढील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा :
अ. आगंतुक
i. विद्यमान
ब. अतिवृष्टी
ii. कर्णकटू
क. माजी
iii. अनावृष्टी
ड. कर्णमधुर
iv. आमंत्रित
(1) ii, i, iv, iii
(2) iv, iii, ii, i
(3) iv, iii, i, ii
(4) iii, iv, i, ii
17. ‘घरादारास व देशास पारखा झालेला’ या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा.
(1) निराधार
(2) निर्वासित
(3) हुतात्मा
(4) दरवेशी
18. ‘प्रथमा विभक्ती’ चे प्रत्यय ओळखा.
(1) स, ला, ते, ना
(2) ने, ए, शी, नी
(3) प्रत्यय नाहीत
(4) त, ई, आ
19. ‘राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
(1) राजा नरेंद्र
(2) मुकुट
(3) शोभने
(4) एकही पर्याय नाही
20. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत ?
(1) पाच
(2) तीन
(3) चार
(4) सहा
21. ‘अनल’ या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा.
(1) वन्ही
(2) जंगल
(3) गगन
(4) अंबर
22. अनुकरण वाचक शब्द ओळखा.
(1) शेजारी पाजारी
(2) समोरासमोर
(3) मधूनमधून
(4) गुटुगुटीत
23. पुढील विधान वाचा. अ. ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र, एकवचनी, तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी असते, तेव्हा भावे प्रयोग होतो. ब. भावकर्तरी प्रयोगात कर्ताही नसतो कर्मही नसते. क. भावे प्रयोग सर्व काळात होतो.
(1) फक्त अ व ब बरोबर
(2) फक्त ब व क बरोबर
(3) फक्त अ व क बरोबर
(4) सर्व बरोबर
24. पुढील विधाने वाचा. अ. दोन छोटी विधाने उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना अर्धविराम हे चिन्ह वापरतात. ब. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविराम हे चिन्ह वापरतात. क. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास अपसारण चिन्ह वापरतात.
(1) फक्त अ व क बरोबर
(2) फक्त ब व क बरोबर
(3) फक्त अ व ब चूक
(4) सर्व चूक
25. ‘तोंडात तीळ न भिजणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
(1) मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे
(2) हाव सुटणे
(3) तोंड काळे करणे
(4) कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे
26. Complete the following sentence using the correct choice. Life is related to death in the same way as hope is related to ________.
(1) sad
(2) despair
(3) pain
(4) cry
27. Join the prefixes to the roots to make meaningful words :
a. un-
i. qualify
b. de-
ii. examine
c. re-
iii. fashionable
d. dis-
iv. moralise
(1) i, iii, ii, iv
(2) iii, iv, ii, i
(3) iv, iii, ii, i
(4) iii, iv, i, ii
28. Identify the correct expressions. a. Give the devil his due b. Between the devil and the deep river c. Go to the devil
(1) a and b only
(2) a and c only
(3) b and c only
(4) a, b and c
29. Choose the correct pair of words to fill in the blanks. a. In the end, she ________ to our request. b. The amount of money we raised ________ all our expectations.
(1) acceded, exceeded
(2) exceeded, acceded
(3) acceded, exceeding
(4) None of the above
30. Complete the following sentence using the most appropriate preposition. The youngest ________ the three sisters is certainly the wisest.
(1) between
(2) among
(3) of all
(4) in
31. Choose the incorrectly spelt word.
(1) distress
(2) entertained
(3) dismiss
(4) dismissel
32. Choose the correct sentences. a. If it rains, the match is cancelled. b. If I eat cheese, it gives me indigestion. c. If I will have time, I shall visit the exhibition.
(1) a only
(2) b and c only
(3) b only
(4) a, b and c
33. Choose the correctly spelt word.
(1) accomodate
(2) acommodate
(3) accommodate
(4) accomodat
34. Change into complex sentence. A century old craft, the renowned Kolhapuri chappal is still crafted by hand.
(1) Though it is a century old craft, the renowned Kolhapuri chappal is still crafted by hand.
(2) It is a century old craft, the renowned Kolhapuri chappal are crafted by hand.
(3) The century old craft the renowned Kolhapuri chappal is crafted by hand.
(4) Though is a century old craft, the renowned Kolhapuri chappals is crafted by hand.
35. Give the one word substitute for the following phrases or a clause :
a. Animal which lives on meat
i. Astronomy
b. A masculine woman
ii. Amazon
c. Animal which live on fish
iii. Carnivorous
d. The study of stars and planets
iv. Piscivorous
(1) iii, ii, iv, i
(2) i, ii, iii, iv
(3) iv, iii, ii, i
(4) ii, iv, i, iii
36. Choose the word that is nearly the same in meaning as the word given in capital. BESEECH
(1) Represent
(2) Look forward
(3) Pray
(4) Search
37. The following sentences are on the same theme, but only one sentence is grammatically correct. Choose the correct sentence.
(1) The students were taught that the earth moved round the sun.
(2) The students were taught that the earth is moving round the sun.
(3) The students were taught that the earth moves around the sun.
(4) The students were taught that the earth would move round the sun.
38. Fill in the blanks using modals from answer options. 1. ________ we go for a movie ? 2. I ________ do any rigorous physical exercise on account of my age. 3. I ________ go to London next week.
(1) will; shall; can’t
(2) shall; can’t; will
(3) can’t; shall; will
(4) shall; will; can’t
39. Change the sentence into exclamatory sentence. I wish I had met you ten years ago.
(1) Had I met you ten years ago !
(2) Ah that I had met you ten years ago !
(3) Ten years ago I met you !
(4) I meet you ten years ago !
40. Choose the word that is nearly the same in meaning as the word given in capital. TURBID
(1) Viscosity
(2) Solution
(3) Thick
(4) Fluid
41. Choose the word opposite in meaning to the given word. Forbidden
(1) Allowed
(2) Prohibited
(3) Agreed
(4) Forsaken
42. Fill in the blank with the correct word choosing from the given options. The ________ of our house was leaking because of heavy rain.
(1) Sealing
(2) Ceiling
(3) Sailing
(4) Ciling
43. Choose the correct option to fill in the blanks in the following sentences. a. Ten pounds ________ a lot of money. b. Twenty miles ________ not a great distance in these days of rapid travel. c. There ________ eggs and bacon for breakfast.
(1) are, is, is
(2) is, is, is
(3) are, are, are
(4) is, are, is
44. Choose the correct sentences. a. Father comes home at five O’clock. b. Father comes to home at five O’clock. c. The children brought a stray kitten home.
(1) a and b only
(2) b and c only
(3) a and c only
(4) a, b and c
45. Fill in the blanks with a preposition. a. He accused me ________ cheating him. b. I do not approve ________ your action. c. The father was very angry ________ his son.
(1) for, of, about
(2) for, of, of
(3) of, of, with
(4) None of the above
46. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाचे एकूण किती खंड आहेत ?
(1) 20
(2) 19
(3) 15
(4) 18
47. कैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक आहेत ?
(1) बेटी बचाओ, बेटी पढाओ
(2) सर्व शिक्षा अभियान
(3) उज्ज्वला योजना
(4) बचपन बचाओ
48. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो ?
(1) प्रफुल्लचंद्र रे
(2) डॉ. सी. व्ही. रामन
(3) श्रीनिवास रामानुजन
(4) वरील तीनपैकी कोणाचाही नाही
49. भारताच्या अणूऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे कोणाला अणूऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचा प्रणेता मानले जाते ?
(1) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
(2) डॉ. होमी जहांगीर भाभा
(3) डॉ. विक्रम साराभाई
(4) डॉ. अनिल काकोडकर
50. टाटा समूहाचे नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याबाबत खालीलपैकी अचूक विधान कोणते आहे ?
(1) एन. चंद्रशेखरन हे टाटा कुटुंबातील नातेसंबंधातून या पदावर आले आहेत.
(2) एन. चंद्रशेखरन हे टाटा कुटुंबाबाहेरील व बिगर पारशी असलेले पहिले अध्यक्ष आहेत.
(3) टाटा समूहाशी जोडले जाण्याअगोदर एन. चंद्रशेखरन हे रिझर्व्ह बँकेत अधिकारी होते.
(4) टाटा समूहाशी जोडले जाण्याअगोदर एन. चंद्रशेखरन हे एक्स्प्रेस समूहात कार्यरत होते.
51. भारतीय नौदलाची तिसरी सागर परिक्रमा संपूर्ण महिला नौसैनिकांद्वारे आयोजित करण्यात आली आहे. या परिक्रमेसाठी नेमलेल्या नौकेचे नाव काय आहे ?
(1) आय.एन.एस.व्ही. वैष्णवी
(2) आय.एन.एस.व्ही. म्हदेई
(3) आय.एन.एस.व्ही. तारिणी
(4) आय.एन.एस.व्ही. बिहार
52. हिंदू विवाह विधेयकाला पाकिस्तानमध्ये नुकतीच मंजुरी देण्यात आली या कायद्यानुसार हिंदूसाठी मुलगा व मुलगी यांचे लग्नासाठी किमान वय किती वर्षे इतके निश्चित करण्यात आले आहे ?
(1) 16 वर्षे
(2) 17 वर्षे
(3) 18 वर्षे
(4) 21 वर्षे
53. नुकताच जाहीर झालेला 2016 चा साहित्य अकादमीचा मराठी अनुवादाचा पुरस्कार ‘लोकशाही अम्मीस दीर्घपत्र’ या अनुवादित पुस्तकास मिळाला. हा अनुवाद कोणी केला आहे ?
(1) मिलिंद बोकील
(2) मिलिंद चंपानेरकर
(3) राजन खान
(4) उमा कुलकर्णी
54. भारतरत्न पुरस्कारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. भारतरत्न पुरस्कारांची सुरुवात 1954 मध्ये झाली. ब. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. क. सी. राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ड. 2015 मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
(1) अ, ब आणि ड
(2) ब, क आणि ड
(3) अ, क आणि ड
(4) अ, ब, क आणि ड
55. खालील विधाने विचारात घ्या. अ. 2016 च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने रौप्य पदक मिळवले. ब. ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळवणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. क. पी. व्ही. सिंधूला 2015 मध्ये पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले.
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) अ आणि क
(4) अ, ब, आणि क
56. शाहू छत्रपतींनी सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय ?
(1) दिगंबर जैन बोर्डिंग
(2) वीरशैव लिंगायत वसतिगृह
(3) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग
(4) ढोर-चांभार बोर्डिंग
57. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरु केले होते ?
(1) नवा काळ
(2) मौज
(3) दैनिक मराठा
(4) प्रभात
58. भारतातील पहिली रेल्वे ________ ते ________ या ठिकाणी धावली.
(1) मुंबई ते दिल्ली
(2) मुंबई ते पुणे
(3) मुंबई ते ठाणे
(4) दिल्ली ते कलकत्ता
59. ________ यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली.
(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(2) महर्षी शिंदे
(3) म. जोतिबा फुले
(4) गोपाळ हरी देशमुख
60. ________ हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते.
(1) अरविंद घोष
(2) गोपाळ कृष्ण गोखले
(3) बाळ गंगाधर टिळक
(4) बिपिनचंद्र पाल
61. लोह खनिजाचे खालील चार भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. अ. मॅग्नेटाईट व हेमेटाईट ब. लिमोनाईट व सिडेराईट क. लिमोनाईट व हेमेटाईट ड. डोलोमाईट व अँथ्रासाईट
(1) अ आणि ब पर्याय बरोबर
(2) क आणि ड पर्याय बरोबर
(3) ब आणि क पर्याय बरोबर
(4) अ आणि ड पर्याय बरोबर
62. महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रांतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे ?
(1) वनक्षेत्र
(2) ओसाड जमिन
(3) मशागत योग्य पडीक जमिन
(4) कायम कुरणे
63. जोड्या लावा :
नदी
शहर
अ. पांझरा
i. गंगाखेड
ब. कयाधू
ii. पवनार
क. धाम
iii. हिंगोली
ड. गोदावरी
iv. धुळे
(1) i, ii, iv, iii
(2) ii, iv, iii, i
(3) iv, iii, i, ii
(4) iv, iii, ii, i
64. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील ________ हे सर्वात उंच शिखर आहे.
(1) कळसुबाई
(2) महाबळेश्वर
(3) अस्तंभा
(4) साल्हेर
65. आर्थिक व्यवसाय व आर्थिक क्रिया यांच्या योग्य जोड्या लावा.
आर्थिक व्यवसाय
आर्थिक क्रिया
अ. लघुउद्योग
I. प्राथमिक
ब. व्यापार
II. द्वितीयक
क. बौद्धिक क्षमतेच्या सेवा
III. तृतीयक
ड. मासेमारी
IV. चतुर्थक
(1) I, II, III, IV
(2) II, III, IV, I
(3) II, I, IV, III
(4) IV, III, II, I
66. एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत. त्या सर्वांचे कोन एकत्र मोजले तेव्हा 180 झाले; तर बॅगमध्ये एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत ?
(1) 28
(2) 32
(3) 36
(4) 46
67. एक प्रवासी रेल्वे गाडीतून ‘अ’ या ठिकाणाहून सायं ५ वाजता निघून रात्री १० वाजता ‘ब’ या ठिकाणी पोहोचतो. ‘ब’ या ठिकाणापासून ‘अ’ या ठिकाणी जाण्यासाठी दिवसभरात दर तासाला, उदाहरणार्थ 5.30, 6.30, 7.30, इत्यादी प्रमाणे गाड्या सुटतात. या सर्व गाड्यांचा वेग सारखाच असेल, तर प्रवासी ‘ब’ या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला अशा जितक्या गाड्या ओलांडतील ती संख्या दर्शविणाऱ्या पर्यायाची निवड करा.
(1) चौदा
(2) बारा
(3) दहा
(4) आठ
68. समीकरण सिद्ध करण्यासाठी सलमाने पुढील पायऱ्या लिहिल्या. (a) जर क्ष = य तर क्ष2 = क्षय (b) दोन्ही बाजूंतून य2 वजा करून; क्ष2 – य2 = क्षय – य2 (c) (क्ष + य) (क्ष – य) = य (क्ष – य) (d) दोन्ही बाजूंना (क्ष – य) ने भागून क्ष + य = य असे तर्क विसंगत समीकरण मिळण्यात चुकीची ठरलेली कृती दर्शवणारी पायरी निवडा.
(1) (a)
(2) (b)
(3) (c)
(4) (d)
69. एकमेकांपासून 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ‘क’ व ‘ख’ या दोन चार चाकी गाड्या परस्परांच्या विरुद्ध दिशांना ताशी अनुक्रमे 60 व 40 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहेत. एक पक्षी ‘क’ या गाडीबरोबर 80 ताशी किलोमीटर वेगाने ‘ख’ या गाडीच्या दिशेने उडत आहे. जेव्हा हा पक्षी ‘ख’ या गाडीपाशी पोहोचतो तेव्हा तो ‘क’ या गाडीच्या दिशेने उडायला लागतो व त्याचप्रमाणे ‘क’ या गाडीपाशी पोहोचताच तो ‘ख’ या गाडीच्या दिशेने उडायला लागतो. याप्रमाणे तो पक्षी जर उडत राहिला तर या गाड्या एकमेकांपाशी पोहोचेपर्यंत या पक्षाने जितके किलोमीटर अंतर कापलेले असेल ते दर्शवणारा पर्याय निवडा.
(1) 100
(2) 80
(3) 60
(4) 40
70. 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे. 34 : 12 :: 59 : ?
(1) 45
(2) 14
(3) 42
(4) 38
71. जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
(1) सोमवार
(2) रविवार
(3) शनिवार
(4) शुक्रवार
72. दीपक नितीनला म्हणाला, “समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे, तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमधील लहान भाऊ आहे.” तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय ?
(1) मुलगा
(2) भाऊ
(3) पुतण्या
(4) भाचा
73. रवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे 40 मीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळून 30 मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 20 मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 30 मीटर चालला, तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
(1) 70 मीटर
(2) 60 मीटर
(3) 90 मीटर
(4) 80 मीटर
74. सदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. त्याने शंभर रुपयांची फळे खरेदी करून सदाला 500 रुपयांची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला त्याने केळी खरेदी करून सदाला शंभराची नोट दिली व वीस रुपये परत घेतले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदीइतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील, तर त्याला झालेले नुकसान दर्शवणारा पर्याय निवडा.
(1) 510
(2) 600
(3) 420
(4) 470
75. जो घन पुढे दिलेल्या चौकटी कागदाच्या घड्या घालून तयार झालेला आहे त्याची निवड करा :
(1)
(2)
(3)
(4)
(1) पर्याय (1)
(2) पर्याय (2)
(3) पर्याय (3)
(4) पर्याय (4)
76. पुढे दिलेल्या घटकाचे अस्तित्व सिद्ध करणारी अत्यावश्यक बाब निर्देशित करणारा पर्याय निवडा. ‘हिमखंड’
(1) हिम
(2) शीतवाळवंट
(3) हिवाळा
(4) पर्वत
77. प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येणारी योग्य संख्या कोणती ?
(1) 63
(2) 84
(3) 85
(4) 30
78. तीन बहिणी-भाऊ यांच्या मोठ्या ग्रुपमध्ये अमित, नंदू, जगू व बाळू यांच्या वयाची माहिती पुढील प्रमाणे आहे: अमित हा नंदू पेक्षा मोठा आहे पण बाळू पेक्षा लहान आहे. जगू हा नंदू व बाळू या दोघांपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण ?
(1) अमित
(2) नंदू
(3) जगू
(4) बाळू
79. ‘क्ष’ या पारदर्शक कागदाला तुटक रेषेवरून घडी घातल्यास बनणारी योग्य आकृती निवडा :
(क्ष)
(1)
(2)
(3)
(4)
(1) पर्याय (1)
(2) पर्याय (2)
(3) पर्याय (3)
(4) पर्याय (4)
80. विद्याधराने आपल्या मित्राला चिठ्ठीत संदेश लिहिला. “Abc’debbfghiibajckgldmkf” यातील संदेशाचे विसंकेतन ‘Let’s keep our relationship’ असे असेल, तर Dmbejij चे योग्य विसंकेतन दर्शवणारा पर्याय निवडा.
(1) Sekare
(2) Shekhar
(3) Shekara
(4) Shakara
81. खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. 2, 10, 26, 50, ?
(1) 78
(2) 79
(3) 80
(4) 82
82. श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 कि.मी. गेला त्यानंतर डावीकडे वळून 3 कि.मी. गेला नंतर उजवीकडे वळून 4 कि.मी. गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 15 कि.मी. गेला, तर तो आपल्या घरापासून किती अंतरावर असेल ?
(1) 19 कि.मी.
(2) 15 कि.मी.
(3) 12 कि.मी.
(4) 11 कि.मी.
83. जर L = 5, R = 7 तर X + 3 = ?
(1) 10
(2) 11
(3) 12
(4) 13
84. 6 से.मी. बाजू असलेला घनाकार ठोकळा सर्व बाजूंनी लाल रंगात रंगविला तो व्यवस्थित कापून त्याचे प्रत्येकी 2 से.मी. बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले, तर फक्त दोन बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे असतील ?
(1) 9
(2) 6
(3) 8
(4) 12
85. गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत आणि गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत ?
(1) 28
(2) 30
(3) 27
(4) 29
86. 4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती ?
(1) 4001
(2) 401
(3) 5
(4) 4010
87. 11.9 × 1.05 = ?
(1) 12.495
(2) 124.95
(3) 1.2495
(4) 1249.5
88. सीमाकडे असलेल्या 540 आंब्यांपैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले. 24 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत ?
(1) 339
(2) 439
(3) 239
(4) 387
89. द.सा.द.शे. 5 रुपये दराने काही रक्कमेवर दोन वर्षांसाठी सरळ व्याज 50 रुपये होते, तर त्याच दराने दोन वर्षांसाठी त्याच रक्कमेवर चक्रवाढ व्याज किती ?
(1) ₹ 51.25
(2) ₹ 52
(3) ₹ 54.25
(4) ₹ 60
90. जर आयताची लांबी निम्मी व रुंदी तिप्पट केली, तर आयताचे क्षेत्रफळ किती टक्के बदलेल ?
(1) 25 % वाढ
(2) 50 % वाढ
(3) 50 % घट
(4) 75 % घट
91. हेमंतच्या वजनामध्ये 27 मिळविल्यास उत्तर 93 येते. त्याच्या वजनातून 27 वजा केल्यास उत्तर काय मिळेल ?
(1) 39
(2) 93
(3) 66
(4) 54
92. आराध्यराजचा वाढदिवस 23 मार्च 2015 रोजी बुधवारी असेल, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल ?
(1) सोमवार
(2) मंगळवार
(3) बुधवार
(4) गुरुवार
93. एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली, तर रमेशचे वजन किती ?
(1) 41
(2) 45
(3) 43
(4) 42
94. 105 + 15 × 15 = ?
(1) 1800
(2) 330
(3) 335
(4) 1850
95. शितल आपल्या मासिक पगाराच्या 10% रक्कम कपड्यावर खर्च करते. शिल्लक रक्कमेपैकी 10% रक्कम प्रवासावर खर्च करते. जर तिचा पगार 6,000 रु. असेल, तर तिची बचत किती रुपये आहे ?
(1) रु. 4,800
(2) रु. 4,860
(3) रु. 4,680
(4) रु. 5,000
96. 20 × 0.0022 = ?
(1) 4.84
(2) 0.0484
(3) 0.484
(4) 0.00484
97. जर काटकोन त्रिकोणाची परिमिती 60 से.मी. व कर्ण 26 से.मी. असेल, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
(1) 120 से.मी.²
(2) 240 से.मी.²
(3) 390 से.मी.²
(4) 780 से.मी.²
98. ‘A’ व ‘B’ दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 36 तासात व 45 तासात एक हौद पूर्ण भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले, तर तोच हौद किती वेळात पूर्ण भरेल ?
(1) 81 तास
(2) 19 तास
(3) 18 तास
(4) 20 तास
99. एक आगगाडी 12 कि.मी. अंतर 10 मिनिटात पूर्ण करते. जर ती दूरध्वनी ऑफिस 6 सेकंदात पार करत असेल, तर आगगाडीची लांबी किती ?
(1) 90 मीटर
(2) 100 मीटर
(3) 120 मीटर
(4) 140 मीटर
100. 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 कि.मी. वेगाने धावते व विरुद्ध दिशेने ताशी 80 कि.मी. वेगाने येणाऱ्या दुसऱ्या गाडीस 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती ?